WhatsApp Group Join Now

Maharashtra Animal and Fisheries Science University Recruitment: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये भरती

Maharashtra Animal and Fisheries Science University Recruitment: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई येथे मोठी भरती निघाली असून यामध्ये एकूण 30 रिक्त जागा आहेत.ही भरती प्राध्यापक या पदासाठी निघालेले असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचे असून अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 आहे. तरी इच्छुकांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावा.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा

पदाचे नाव हे प्राध्यापक(Professor) असून या पदासाठी उमेदवाराने PhD पदवी धारण केलेले पाहिजे, तसेच या पदासाठी एकूण 30 रिक्त जागा आहेत.

वयाची अट, परीक्षा शुल्क आणि वेतनमान

या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 45 वर्षापर्यंत असावे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये 5 वर्षाचे सूट राहील. या भरतीसाठी परीक्षा शुल्क हे 2000 रुपये असून राखीव प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क हे 1000 रुपये आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 1,44,200 रुपये ते 2,18,200 रुपये या दरम्यान वेतन मिळेल.

इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर आपला अर्ज सादर करावा: The Registrar, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Futala Lake Road, Nagpur- 440 001 (M.S.)

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा (Click here to see notification): https://shorturl.at/uCKVY

Official website: https://mafsu.ac.in/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..? (How to apply for MAFSU recruitment)

या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. वर दिलेल्या पत्त्यावर आपण समक्ष जाऊन अर्ज सादर करू शकता किंवा पोस्टाने अर्ज पाठवायचा असल्यास तो 21 मार्च 2024 पर्यंत पोहोचेल या हिशोबाने पाठवावा. अर्ज सोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडावीत. अपूर्ण असलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज पाठवण्यापूर्वी सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

Share this post:

Leave a comment