रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने AC डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तिकीट जर आर एस सी कन्फर्म असेल तर त्यांना बेड रोल किट ज्यामध्ये लीनेन आणि ब्लॅंकेट असेल हे देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Indian Railway: भारतामध्ये प्रवासाचे एक सुरक्षित व स्वस्त असे साधन म्हणून रेल्वे कडे पाहिले जाते.रोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे प्रवास करण्यासाठी आपल्याला आपले सीट आरक्षित करावे लागते. परंतु एवढ्या मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असल्यामुळे आरक्षित सीट मिळणे थोडे कठीण असते. जर आपल्याला आरक्षित सीट हवे असेल तर प्रवासाच्या थोडे दिवस अगोदर आपल्याला हे सीट आरक्षित करून ठेवावे लागते. जर आपण सीट आरक्षित केलेले असेल आणि आपली सीट कन्फर्म झालेले नसेल तरीही आपल्याला आरक्षणाचे पैसे भरावे लागतात, परंतु सीट मिळत नाही. जर आपले तिकीट कन्फर्म झाले तरच सीट मिळते. हेच लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने एक नवीन नियम काढून अशा सूचना दिल्या आहेत की, जर प्रवाशाने AC डब्याचे रिझर्वेशन काढलेले असेल व त्याचे तिकीट RAC कन्फर्म असेल तर त्या प्रवाशाला बेड रोल किट ज्यामध्ये लिनेन आणि ब्लॅंकेट असेल हे देण्यात यावे. कारण असे बरेच प्रवासी असतात की ज्यांचे तिकीट हे RAC कन्फर्म असते, परंतु त्यांना बेड रोल किंवा लेनेन मिळत नाही. जर आपले तिकीट RAC कन्फर्म असेल तर आपल्याला एका सीटवर दोन प्रवाशांना प्रवास करावा लागतो. जर हा पल्ला दूरचा असेल तर प्रवाशांचे खूप हाल होतात. ही नवीन सुविधा उपलब्ध केल्यामुळे प्रवाशांचा फायदा होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने याबद्दलचे याबद्दलचे पत्र सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना 18 डिसेंबर रोजी पाठवले आहे व यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की आर एस सी तिकीट धारकांना प्रवासादरम्यान बीड रोडची सुविधा प्रदान करण्यात यावी. ही सुविधा फक्त AC कन्फर्म कॅटेगिरी वाल्या साठी आहे. यामध्ये AC चेअर कारच्या प्रवाशांचा उल्लेख नाही. ईशान्य रेल्वेचे सीपीआरओ पंकज कुमार सिंह यांनी स्पष्ट सांगितले आहे की, सिंगल क्लास मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच ही सुविधा मिळेल, हे पत्र आम्हाला प्राप्त झाले आहे, याची कारवाई सुरू आहे.