WhatsApp Group Join Now

पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती

पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध अशा 10 रिक्त जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. यामध्ये स्टाफ नर्स महिला, स्टाफ नर्स पुरुष, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष अशा विविध पदांच्या 10 जागा आहेत. याची शैक्षणिक पात्रता बीएससी नर्सिंग /जी एन एम सह एम एन सी नोंदणी हवी आहे. तसेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बारावी उत्तीर्ण आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण झालेला असावा. वयाची मर्यादा ही 65 वर्षापर्यंत आहे. या परीक्षेसाठी आपणास राखीव उमेदवारासाठी 150 रुपये तर अराखी उमेदवारांसाठी 100 रुपये परीक्षा शुल्क आहे. वेतन मान 18000 ते 20000 रुपये मिळेल. नोकरी करण्याचे पनवेल हे ठिकाण आहे.

अर्ज करण्याचा पत्ता: पनवेल महानगरपालिका, आरोग्य विभाग, देवाळे तलावाच्या समोर गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल- ४१०२०६.

ऑफिशियल वेबसाईट: https://www.panvelcorporation.com

Email Id: 15fcpanvel@gmail.com
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करून जाहिरात पहा: https://drive.google.com/file/d/1cNyqxIlVvOKDRUjLIpF7tFBKxE1P6qPn/view?usp=sharing

पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती

अर्ज कसा करावा:
अर्ज करण्यासाठी आपल्याला आपला अर्ज दिलेल्या ई-मेल आयडीवर ईमेल करायचा आहे. हा ईमेल आपल्याला 26 डिसेंबर 2023 च्या अगोदर किंवा या तारखेपर्यंत करायचा आहे. अर्ज करत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावीत. जर आपण ईमेल करू शकत नसाल तर आपण सविस्तर जाऊन ही अर्ज सादर करू शकता. अधिक माहितीसाठी वर दिलेली जाहिरात पहावी.

Share this post:

Leave a comment