Virat Kohali Returns to India:(22 Dec) सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने रंगत आहेत. लवकरच म्हणजे 26 डिसेंबर पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये कसोटी मालिका खेळली जाणार आहे. परंतु काही आपत्कालीन कारणामुळे विराट कोहली ही मालिका खेळू शकणार नाही, त्यामुळे तो मायदेशी परतला आहे. तसेच दुसरीकडे ऋतुराज गायकवाड हा तंदुरुस्त नाही, त्यालाही दुखापत झाली असल्या कारणामुळे तोही या मालिकेत खेळणार नसल्याचे वृत्त आहे. हे दोन दिग्गज खेळाडू ही कसोटी मालिका खेळत नसल्यामुळे भारतीय संघापुढे एक नवे आव्हान उभे राहिले आहे.
कोहली कडून चाहत्यांच्या होत्या खूप अपेक्षा
वर्ल्ड कप मध्ये विराट कोहली चा परफॉर्मन्स खूपच चांगला होता. त्याने क्रिकेटच्या त्यांची व त्याच्या चाहत्यांची अजिबात निराशा केली नाही. वर्ल्ड कप मध्ये केलेल्या कामगिरीमुळे या कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहली कडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. परंतु काही आपत्कालीन कारणामुळे तो, ही कसोटी मालिका घेऊ शकणार नाही, ही बातमी ऐकून त्याचे चाहते व क्रिकेट शौकीन नाराज होणार यात वाद नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना सेंचुरियन मध्ये खेळला जाणार आहे.
भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि शुभनम गिल हे दोघेही या कसोटी सामन्यात आपणास दिसतील. ऋतुराज ला ही हा कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली होती, परंतु बोटाला झालेल्या दुखापतीमुळे तो ही कसोटी मालिका खेळू शकणार नाही. तसेच ईशान किशनला ही या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु त्याने स्वतःहून ही मालिका खेळण्यास नकार दिला. त्यामुळे के एस भरतला या कसोटी मालिकेमध्ये स्थान मिळाले आहे.