UPI New Rules: आज कालच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती हा छोट्या मोठ्या ट्रांजेक्शन साठी UPI पेमेंट चा वापर करत असतो. UPI पेमेंट करण्याचे काही फायदे आहेत तर काही तोटे. UPI पेमेंट करत असताना आपल्याला ज्या समस्या रोख रकमेने व्यवहार करताना येत होते, ते येणे कमी झाले आहेत जसे की, चिल्लर ची समस्या होती ती या माध्यमातून सुटण्यासाठी खूप मोठी मदत झाली किंवा प्रत्येक वेळेस खिशामध्ये काही रक्कम शिल्लक ठेवून फिरण्याची आता गरज नाही. जर तुमच्याकडे UPI अकाउंट असेल तर तुम्ही मोबाईल वरून तुमची व्यवहार पूर्ण करू शकता. परंतु आरबीआय ने सांगितल्याप्रमाणे यूपीएचे काही नियम आहेत, त्यामध्ये बदल झालेला आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत की, हे नवीन नियम काय आहेत.
तुमचे UPI अकाउंट ID केव्हा बंद किंवा सस्पेंड होऊ शकते..?
तुम्ही तुमच्या UPI अकाउंट वरून एक वर्षापासून कोणताही व्यवहार केला नसेल तर तुमचे अकाउंट सस्पेंड किंवा बंद होऊ शकते. म्हणजे तुम्ही जर एक जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत जर UPI व्यवहार केले नसतील तर तुमचे UPI अकाउंट सस्पेंड होईल.
एका दिवसाची लिमिट हे एक लाख रुपये असणार आहे. म्हणजे एका दिवसात आपण UPI द्वारे एक लाखापर्यंतचे पेमेंट करू शकता.
स्पेशल पेमेंट लिमिट: यामध्ये हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्था यांना एक दिवसासाठी जास्तीत जास्त पाच लाख लिमिट असणार आहे. म्हणजेच शाळा आणि कॉलेज अशा ठिकाणी तुम्ही पाच लाख रुपये एकाच वेळेस भरू शकता.
ट्रांजेक्शन सेटलमेंट टाईम: जर आपण दोन हजार रुपये पेक्षा जास्त रुपयांचे व्यवहार करत असाल, तर त्यासाठी तुम्हाला चार तास वाट पाहावी लागणार आहे. म्हणजेच जर तुम्ही एखाद्या ठिकाणाहून एखादी वस्तू खरेदी केली असेल आणि त्याची किंमत ही दोन हजार हून अधिक असेल, तर तुम्ही पेमेंट केल्यापासून चार तासानंतर समोरच्या व्यक्तीच्या खात्यावर ते पैसे जातील. इथून पुढे जर आपण हॉटेल किंवा शॉपिंग साठी गेला असाल आणि आपण दोन हजाराच्या पुढे जर बिल केले असेल, तर समोरचा व्यक्ती UPI पेमेंट स्वीकारला नाही. कारण पेमेंट सेटलमेंट होण्यासाठी चार तासाचा कालावधी लागेल आणि त्या चार तासांमध्ये तुम्ही ते पेमेंट कॅन्सल ही करू शकता आणि कॅन्सल केल्यानंतर ते पैसे परत तुमच्या खात्यावर येतील.
पण एखाद्या व्यक्ती असा असेल की तुम्ही ज्याला नेहमी दोन हजाराच्या पुढील रक्कम असलेले व्यवहार करत असाल, तर अशा व्यक्तींना हे पैसे लगेच ट्रान्सफर होतील.
ट्रांजेक्शन कॅन्सलेशन ऑप्शन: तुम्ही जर एखाद्या दुकानदाराला किंवा व्यक्तीला दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रुपयांचे पेमेंट केले असेल आणि जर तुम्हाला ते पेमेंट कॅन्सल करायचे असेल तर चार तासांमध्ये तुम्ही तुमचे पेमेंट कॅन्सल करू शकता. याचा फायदा कसा आहे की जर चुकून तुमच्या खात्यातून तुम्ही नजर चुकलेले दुसऱ्या अनोळखी व्यक्तीला जर काही पैसे पाठवले असतील, तर ते तुम्ही कॅन्सल करू शकता. परंतु ते चार तासाच्या आत गेले पाहिजे आणि ती रक्कम 2000 च्या वर असली पाहिजे.
विक्रेत्याचे खरे नाव डिस्प्ले होणार: आता UPI आयडीवर खरे नाव तुम्हाला दिसेल. म्हणजे जर तुम्ही एखादा QR कोड स्कॅन केला तर त्याच्याशी संबंधित ज्या व्यक्तीचे बँक खाते आहे, त्याच व्यक्तीचे नाव तुम्हाला तिथे दिसेल. पूर्वी सिम कार्ड बदलल्यानंतरही काही वेळेस चुकीचे नाव आपल्याला दिसायचे. परंतु आता हा महत्त्वपूर्ण बदल यामध्ये करण्यात आला आहे.
UPI क्रेडिट : पूर्वी आपल्या यूपीआय वॅलेट ला जर पैसे असतील तरच आपण ट्रांजेक्शन करू शकत होतो. परंतु आता काही रक्कम आपण आपल्या बँकेकडून घेऊ शकतो. ही रक्कम आपल्या सिबिल स्कोर नुसार बँक आपल्याला देईल.
UPI एटीएम: जसे आपण एटीएम डेबिट कार्ड वापरून मशीन मधून पैसे काढतो, त्याचप्रमाणे आता QR कोड स्कॅन करून आपणास मशीन मधून पैसे काढता येतील. यासाठी जपानच्या हिताची कंपनी सोबत एक करार झाला असून आणि लवकरच आपल्याला एटीएम पाहायला मिळेल.
UPI ट्रांजेक्शन चार्जेस: जर आपण UPI क्रेडिट लिमिट वापरून काही पैसे आपल्या बॅलेट मध्ये घेतले असतील आणि ते वापरले असतील तर त्याचे ट्रांजेक्शन चार्जेस आपल्याला भरावे लागते.
तर हे आहेत UPI बद्दलचे 2024 चे नवीन नियम. जर तुमचेही UPI अकाउंट एक वर्षापासून इन ऍक्टिव्ह असेल तर तुम्ही 31 डिसेंबर 2024 पूर्वी त्यावर ट्रांजेक्शन करून घ्यावे, जेणेकरून अकाउंट सस्पेंड होण्याची शक्यता कमी होईल. ही माहिती आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा.