आजकाल सर्व मार्केट हे डिजिटल मध्ये झालेला आहे. आज काल सर्व लोक हे छोट्या छोट्या व्यवहारासाठी यूपीआय (UPI) पेमेंटचा वापर करीत आहेत. यूपीआय द्वारे ट्रांजेक्शन करणे खूपच सोपे असल्यामुळे प्रत्येक जण आज हाच पर्याय वापरत आहे. परंतु आज पर्यंत यूपीआय ट्रांजेक्शन करण्यासाठी जे लिमिट होते ते लिमिट वाढवण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. याची माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. यूपीआय पेमेंटची डेली लिमिट हे एक लाख रुपये होते. परंतु आता हे लिमिट वाढवून पाच लाख पर्यंत करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
परंतु पाच लाख रुपयांपर्यंतचे हे ट्रांजेक्शन तुम्ही शैक्षणिक संस्था किंवा रुग्णालयांमध्येच करू शकता, हेही जाणून घेणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच जिथे जिथे अत्यावश्यक सेवा असतात जसे की रुग्णालय किंवा शैक्षणिक संस्था या ठिकाणी तुम्ही पाच लाख रुपयांचे पेमेंट करू शकता परंतु सामान्य अशा ठिकाणी आपण एक लाख रुपयापर्यंतचेच पेमेंट एका दिवसात करू शकतो.