WhatsApp Group Join Now

TAX Info: तुम्हाला माहित आहे का..? एका वर्षात आपण किती रक्कम आपल्या बँक खात्यातून विना टॅक्स काढू शकतो..?

TAX Info: आज-काल प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते हे असते, दैनंदिन जीवनात आपण व्यवहारासाठी बँकेतील पैशांचा वापर करतो. आणि UPI ट्रांजेक्शन आल्यामुळे बरेच लोक यूपीआय द्वारे व्यवहार करतात.परंतु जर तुम्ही वर्षातून वीस लाखांपेक्षा जास्त पैसे बँकेतून काढत असाल, तर त्या अगोदर आपल्याला काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहेत.

आपण ज्या वेळेस आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा भागवण्यासाठी किंवा घरातील विविध कार्यक्रमांसाठी जर पैसे काढत असेल, तर आपण एका वर्षामध्ये फक्त वीस लाख रुपये काढू शकतो. परंतु वीस लाखापेक्षा जास्त रुपये जर आपल्याला काढायचे असतील तर त्यासाठी आपल्याला टीडीएस भरावा लागतो. म्हणजे तुम्ही वीस लाखाच्या पुढे बँकेतून रक्कम काढू शकता. परंतु त्यासाठी लागणारा टीडीएस तुम्हाला भरावा लागेल. मात्र हा नियम अशा लोकांना लागू होतो की, जे लोक इन्कम टॅक्स भरत नाहीत. ज्या लोकांनी सलग तीन वर्षे इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला आहे, अशा लोकांना चिंता करण्याची गरज नाही. परंतु जे लोक इन्कम टॅक्स रिटर्न भरत नाही अशा लोकना जर एका वर्षात वीस लाखापेक्षा जास्त रक्कम काढायचे असेल तर त्यांना टीडीएस भरावा लागतो.
आयटीआर(ITR) भरत असणारे लोक एका वर्षात किती रक्कम काढू शकतात..?
जर आपण आयटीआर भरत असाल तर एका वर्षात आपण एक कोटी रुपयांपर्यंत ची रक्कम विना टीडीएस काढू शकतो. पण जर एक कोटी पेक्षा जास्त रक्कम आपण काढत असेल तर आपल्याला टीडीएस भरावा लागू शकतो.

किती टीडीएस भरावा लागतो..?
तुम्ही जर ITR भरत असाल आणि जर तुम्ही एककोटी होऊन अधिक रक्कम एका वर्षांमध्ये काढली, तर तुम्हाला दोन टक्के दराने ITR द्यावा लागतो.
जर तुम्ही ITR भरत नसाल तर तुम्हाला वीस लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेतून काढली, तर दोन टक्के टीडीएस भरावा लागेल.
परंतु त्याच लोकांनी जर एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम एका वर्षामध्ये काढली, तर पाच टक्के टीडीएस भरावा लागेल.

Share this post:

Leave a comment