Solapur Mahanagarpalika Recruitment: सोलापूर महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली असून, यामध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी पदाची एक रिक्त जागा आहे. या जागेसाठी ही भरती आहे, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया मुलाखती द्वारा घेण्यात येणार आहे, ही मुलाखत 2 जानेवारी 2024 रोजी असणार आहे.
पदाचे नाव: मुख्य अग्निशमन अधिकारी
पात्रता:
- उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावे
- राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथून B.E. Fire Engg. उत्तीर्ण/ राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांचेकडील Divisional Fire Officer पाठयक्रम (अग्निशमन अभियांत्रिकीमधील प्रगत पदविका )/The Institution of Fire Engineers (U.K.) किंवा (India) या संस्थेकडील सदस्यत्व (M.I.Fire) / कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर (The Institution of Fire Engineers (U.K.) यांचे सदस्यत्व असणे आवश्यक आहे
- उमेदवाराने अग्निशमन दलातील सहाय्यक अग्निशमन अधिकारी म्हणून किमान तीन वर्षे काम केलेले असावे
रिक्त जागा: ०१
परीक्षा शुल्क: नाही
वेतन मान: नियमानुसार
मुलाखतीचे ठिकाण: सामान्य प्रशासन विभाग सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
नोकरीचे ठिकाण: सोलापूर
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/ilmr1
ऑफिशियल वेबसाईट: https://www.solapurcorporation.gov.in
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
ही भरती प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 2 जानेवारी 2024 रोजी सकाळी ११ वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.