Shetkari Aakrosh Morcha: शेतकऱ्यांच्या काही प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे व सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याकरता शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाची सुरुवात शिवनेरीच्या पायथ्यापासून झाली आहे. जुन्नर मधील शिवनेरीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात झाली. हा मोर्चा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून काढला जात आहे. हा मोर्चा चार दिवस निघणार असून याचा शेवट पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर होणार आहे. 30 डिसेंबर रोजी या मोर्चाचा समारोप होईल. यावेळेस एका सभेचे आयोजन केले आहे, त्यात शरद पवार हे लोकांना संबोधित करतील. यामध्ये शेतकऱ्यांच्या काही मागण्या जसे की, कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ उठवावी जेणेकरून कांद्याला चांगला भाव मिळेल तसेच जे शेतकरी संकटात आहेत त्यांचे तात्काळ कर्जमाफी करावी, दिवसा अखंडित वीज पुरवठा करावा कारण रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा केला असता, शेतकऱ्यांवर बिबट्याचे हल्ले होण्याची शक्यता असते, तसेच पिक विमा साठी एक सुलभ व सोपे धोरण तयार करावे, दुधासाठी दरवाड करावी, शेतकऱ्यांना जे उत्पन्न मिळते त्यातून ते त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांना सुलभ रीत्या शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून द्यावं. अशा काही शेतकरी हिताच्या मागण्या या मोर्चा मधून केल्या गेल्या आहेत.
शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सहा प्रमुख मागण्या:
महाविकास आघाडी कडून अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा काढला गेला आहे. याचा समारोप 30 डिसेंबर 2023 रोजी होईल, या दिवशी एक सभा होईल व या सभेला माननीय शरद पवार उपस्थित राहतील. या आक्रोश मोर्चाचे कारण व प्रमुख मागण्या काय आहेत ते आपण पाहूया.
या सहा प्रमुख मागण्यासाठी निघाला आहे हा शेतकरी आक्रोश मोर्चा,
१. कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ उठवावी व त्यासाठी एक ठोस धोरण आखव
२. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी
३. पिक विमा साठी सुलभ धोरण तयार कराव
४. दिवसा अखंडित वीज पुरवठा व्हावा
५. दूध दरवाढ आणि खासगी संस्थांना दूध पुरवणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनुदान मिळावं
६. शेतकऱ्यांच्या मुलांना सुलभरीत्या शैक्षणिक कर्ज उपलब्ध व्हावं
या मागण्यासाठी हा मोर्चा काढला जात आहे, याची सुरुवात शिवनेरीच्या पायथ्यापासून झालेली आहे.