PM Vishwakarma Yojana 2023:
जर तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर तो 17 सप्टेंबरपासून सुरू झालेला आहे. ऑनलाइन नोंदणी अधिकृत वेबसाइटद्वारे केली जाऊ शकते. जाणून घ्या या योजनेसाठी कोण पात्र आहे, कोणती कागदपत्रे (Documents)आवश्यक आहेत आणि अर्जाची प्रक्रिया (Process)काय आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील कारागीर, सुतार, लोहार, गवंडी इत्यादींसाठी पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेत येणाऱ्या लोकांना सरकार 3 लाख रुपयांचे कर्ज देणार असून हे कर्ज केवळ 5 टक्के व्याजदराने मिळणार आहे. पाच टक्के व्याज दराने कर्ज आपल्याला 18 महिन्यांच्या मुदतीवर मिळत आहे. या योजनेत दगडी कोरीव शिल्पकार,न्हावी संबंधित 18 क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपल्याला प्रथम नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाइन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने आपण नाव नोंदणी करू शकता. नाव नोंदणी 17 सप्टेंबर 2023 रोजी चालू झालेली आहे. नाव नोंदणी करण्यासाठी आपण https://pmvishwakarma.gov.in या वेबसाईटवरून नाव नोंदणी करू शकता. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणी पात्र आहे, कोण कोणते कागदपत्र आवश्यक आहेत, अप्लाय कसं करायचं.याची माहिती आपण पाहणार आहोत.
या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपल्याला प्रथम नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाइन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने आपण नाव नोंदणी करू शकता. नाव नोंदणी 17 सप्टेंबर 2023 रोजी चालू झालेली आहे. नाव नोंदणी करण्यासाठी आपण या वेबसाईटवरून नाव नोंदणी करू शकता. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणी पात्र आहे, कोण कोणते कागदपत्र आवश्यक आहेत, अप्लाय कसं करायचं.याची माहिती आपण पाहणार आहोत.
PM Vishwakarma Yojana नेमकी काय आहे..?
पीएम विश्वकर्मा योजना ही भारत सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनांपैकी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेसाठी सरकारने 13000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. या योजनेअंतर्गत कारागीर कामगार यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यात येईल. तसेच त्या लोकांना ट्रेनिंग म्हणजेच कार्यशाळा ही मोफत दिली जाईल, त्याचबरोबर कमी दराने कर्जही दिले जाईल आणि ट्रेनिंग संपल्यानंतर त्या कारागिरांना अवजारे खरेदी करण्यासाठी १५००० रुपये दिले जातील. पहिल्या टप्प्यामध्ये ५ टक्के व्याज दराने १ लाख रुपये मिळतील. आवश्यक असल्यास दुसऱ्या टप्प्यामध्ये २ लाखाचे कर्ज या योजनेमार्फत आपल्याला मिळू शकते. असे एकूण ३ लाखापर्यंतचे कर्ज पाच टक्क्याने आपण घेऊ शकतो.
PM Vishwakarma Yojana कोणासाठी आहे..?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तो भारताचा नागरिक हवा. तर उमेदवाराचे वय १८ वर्षे ते ५० वर्ष यादरम्यान असावे. जर आपण सरकारी नोकर असाल तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. या योजनेचा लाभ खालील क्षेत्रातील लोक घेऊ शकतात.
लोहार, सुतार, सुवर्णकार, नाभिक, चर्मकार, गवंडी, कुंभार, शिंपी, धोबी अशा देशातील विविध १४० जाती समूहातील लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
PM Vishwakarma Yojana फायदा काय आहे..?
या योजना मार्फत आपल्याला तीन लाखापर्यंतचे कर्ज तर मिळू शकते, सोबत अवजारे खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपये मिळतात, मोफत प्रशिक्षण मिळते. ही योजना सरकारची असल्यामुळे आपण जगभरातील बाजारपेठांमध्ये प्रवेश करू शकता. ही योजना वाणिज्य आणि उद्योजकता मंत्रालयाशी संबंधित आहे, त्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होईल. कार्यशाळेद्वारे दिलेल्या प्रशिक्षणामुळे नवीन तांत्रिक प्रगती होऊ शकते. नवीन नवीन तंत्रज्ञान पाहायला व वापरायला मिळू शकते.
PM Vishwakarma Yojana साठी कोण कोणती कागदपत्र आवश्यक आहेत..?
पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र, पॅन कार्ड, आधार कार्ड यांची झेरॉक्स कॉपी, ई-मेल आयडी, फोन नंबर, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र
या योजनेसाठी अर्ज कसा करावा..?
https://pmvishwakarma.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी
तिथे आपल्याला अप्लाय ऑनलाईन ही लिंक दिसेल त्यावर क्लिक करावे.
पीएम विश्वकर्मा रजिस्ट्रेशन वर क्लिक करून नोंदणी करावी.
नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक व पासवर्ड तुमचा मोबाईल वरती मिळून जाईल.
त्यानंतर नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचून भरावा.
आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे व फॉर्म सबमिट करावा.