PM Kisan Sanman Nidhi Yojana : केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रति महिना पाचशे रुपये सन्मान निधी दिला जातो. याची सुरुवात केंद्र सरकार पासून करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने हा निधी देण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला बारा हजार रुपये येतात. परंतु आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान योजना अंतर्गत आता वर्षाला सहा हजार ऐवजी नऊ हजार रुपये दिले जाणार. म्हणजे एकूण मिळणारी रक्कम ही 6 000 अधिक 9000 अशी 14 हजार रुपये आता शेतकऱ्याच्या खात्यावर वर्षाकाठी पडणार आहे.
PM Kisan Sanman Nidhi Yojana योजनेअंतर्गत चार महिन्यांमध्ये दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत होते, म्हणजे प्रति महिना पाचशे रुपये. आता यामध्ये वाढ करून प्रति महिना साडेसातशे रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांना दिले जाऊ शकते, या हिशोबाने चार महिन्याला नऊ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार.
या गोष्टीची माहिती कृषी मंत्रालय एक्सपर्ट समितीचे सदस्य आदित्य शेष यांनी दिली, त्यांनी सांगितले की महागाईमुळे आणि उत्पन्नातील घट यामुळे शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत व त्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पीएम किसान सन्मान योजनेचा अनुदान वाढवण्याचा विचार चालू आहे. तसेच कृषी क्षेत्रातही दरवर्षी विकास दरामध्ये जवळपास चार टक्क्याने वाढ होत असते. म्हणून शेतकऱ्यांना येणाऱ्या वर्षात या निधीमध्ये वाढ देण्याची केंद्र सरकारची तयारी चालू आहे.
सरकारच्या या योजनेला म्हणजेच पीएम किसन योजनेला पुढील वर्षात फेब्रुवारी महिन्यात जवळपास पाच वर्षे पूर्ण होतात, त्यामुळे हा निधी वाढवला जाऊ शकतो. अशी शक्यता अनेक कृषी तज्ञ वर्तवत आहेत.
For More Info: https://pmkisan.gov.in/