Oil India Limited: दहावी पास व त्यासोबत कोर्स केले असतील, तर त्या उमेदवारांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. ऑईल इंडिया लिमिटेड या कंपनीच्या अंतर्गत ग्रेड 3 पदांच्या एकूण 421 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे. तरी जे उमेदवार इच्छुक आहेत अशांनी शेवटच्या तारखेची वाट न बघता लवकरात लवकर हा अर्ज भरावा व रिविजन ची तयारी करावी.
Table of Contents
पदाचे नाव व पदसंख्या
पदाचे नाव व पदसंख्या यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | पद संख्या |
GRADE-III | 421 पदे |
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व वेतन श्रेणी
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | वेतनश्रेणी |
GRADE-III | 10th pass+(Specific Course) | ₹ 26,600.00 – 90,000.00 |
वयाची अट: उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असावे. जास्तीत जास्त वयासाठी पदानुसार वेगवेगळी वयाची अट आहे. यामध्ये जास्तीत जास्त वय हे 30 वर्षे ते 33 वर्षे पर्यंत आहे. तसेच SC ST या प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे तर OBC वर्गातील उमेदवारांना 3 वर्षाची वयाची सूट असेल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा:https://oilmulti.cbtexamportal.in/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा:https://shorturl.at/yGNS3
अधिकृत वेबसाईट:https://www.oil-india.com/
परीक्षेचे स्वरूप
त्यामध्ये तीन भाग असतील भाग A मध्ये इंग्लिश भाषा जनरल नॉलेज आणि ऑल इंडिया लिमिटेड या कंपनी बाबत प्रश्न विचारले जातील. भाग B मध्ये रीजनिंग अंकगणित व मेंटल एबिलिटी याबद्दल प्रश्न विचारले जातील. भाग C मध्ये त्या क्षेत्राबद्दल असलेल्या तांत्रिक बाबींबद्दल आणि शैक्षणिक पात्रतेनुसार प्रश्न विचारले जातील.
ही परीक्षा कम्प्युटर बेस्ड परीक्षा असेल व यामध्ये कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे.अधिक माहितीसाठी जाहिरात सविस्तर वाचा.
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात व्यवस्थित वाचावी आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवावी. अपूर्ण कागदपत्रांशिवाय आपण पूर्ण अर्ज भरू शकत नाही त्यामुळे सर्व कागदपत्रांची एक सॉफ्ट कॉपी रंगीत फोटो स्वाक्षरी या सर्व गोष्टी जवळ ठेवाव्यात. हे अर्ज आपल्याला 30 जानेवारी 2024 पर्यंत भरायचे आहे. अधिक माहिती हवी असल्यास कृपया जाहिरात पहा.
Oil India Limited: 10th pass and accompanying course is a great golden opportunity for those candidates. Oil India Limited has released a recruitment for a total of 421 vacancies for Grade 3 posts. Applications are invited from interested and eligible candidates. This application is to be done online. Last date to apply is 30 January 2024. However, those candidates who are interested should fill this application form as soon as possible and prepare for revision without waiting for the last date.
सरकारी नोकरी बद्दल किंवा खाजगी नोकरी बद्दल अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट देत जा. शासकीय योजना, शेती विषयक योजना यासाठीही आपण ही वेबसाईट पाहू शकता.