NICL Recruitment: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 274 जागांची भरती निघाली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 जानेवारी 2024 आहे. यामध्ये प्रशासकीय अधिकारी विशेषज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी जनरल अशा दोन पदांसाठी रिक्त जागा आहेत.
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागांसाठी कृपया खालील तक्ता पाहावा.
पद क्रमांक | पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
1 | प्रशासकीय अधिकारी (AO)-विशेषज्ञ / Administrative Officer (AO)-Specialist | MBBS/MD/MS/LLB/LLM /ICAI/ICWA/BE./बी.टेक/एम.ई./M.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/ऑटोमोबाईल)/MCA/हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी | 142 |
2 | प्रशासकीय अधिकारी (AO)-जनरल / Administrative Officer (AO)-Generalist | 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदवी (SC/ST – 55% गुण) | 132 |
या भरतीसाठी परीक्षा शुल्क हे 1000 रुपये आहे, तर SC/ ST/PWD उमेदवारांसाठी हे 250 रुपये आहे.
वेतन मान हे नियमानुसार असेल.जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा:ऑफिशियल वेबसाईट:
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://nationalinsurance.nic.co.in/en/recruitments
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/wGIP6
ऑफिशियल वेबसाईट:
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. https://nationalinsurance.nic.co.in/en/recruitments या वेबसाईटवर जाऊन आपल्याला हा अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जातील. अर्ज करत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवावीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 जानेवारी 2024 आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.