NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) रत्नागिरी येथे 53 रिक्त जागांसाठी भरती निघालेली आहे. यामध्ये विविध पदांचा समावेश आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज आपल्याला 26 डिसेंबर 2023 पर्यंत करायचे आहे. हे अर्ज आपण ऑफलाइन पद्धतीने करू शकता.
रिक्त पदांचा तपशील रिक्त जागा व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पाहावा.
पद क्रमांक | पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | रिक्त जागा |
1 | वैद्यकीय अधिकारी / Medical Officer | MBBS (MBBS उपलब्ध न झालेस BAMS) | 17 |
2 | कीटकशास्त्रज्ञ / Entomologists | एम.एस्सी सह प्राणीशास्त्र, 05 वर्षांचा अनुभव | 09 |
3 | सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ / Public Health Specialist | कोणतेही वैद्यकीय पदवीधर सह आरोग्यामध्ये MPH/MHA/एमबीए | 09 |
4 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Lab Technician | 12वी + डिप्लोमा इन लॅब टेक्निशियन, 05 वर्षांचा अनुभव | 18 |
वयाची अट: 38 वर्षांपर्यंत (राखीव प्रवर्ग/NHM कर्मचारी – 05 वर्षे सूट)
एमबीबीएस, विशेषतज्ञ आणि अतिविशिष्ठ विशेपतज्ञ – 70 वर्षे
वैदयकीय अधिकारी, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषधनिर्माता – 65 वर्षे
परीक्षा शुल्क: १५० रूपये, राखीव प्रवर्गासाठी १०० रुपये
नोकरी करण्याचे ठिकाण: रत्नागिरी
वेतनमान: १७००० ते ६०००० रुपये
अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांचे कार्यालय
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://bit.ly/3RtjQU4
ऑफिशियल वेबसाईट: https://ratnagiri.gov.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा नाही तर आपल्याला ऑफलाईन अर्ज करायचा आहे. हा अर्ज आपण दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने करू शकता किंवा समक्ष कार्यालयात जाऊन सादर करू शकता. आपण पाठवलेले अर्ज 26 डिसेंबर 2023 पर्यंत कार्यालयात पोहोचतील या बेताने पाठवावेत. अर्ज पाठवत असताना सोबत आवश्यक कागदपत्रे पाठवावे. अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.