WhatsApp Group Join Now

HDFC ची शिष्यवृत्ती योजना: पहिली ते पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार 75 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती

HDFC ची शिष्यवृत्ती योजना: HDFC बँक ही एक नावाजलेली बँक आहे. या बँकेद्वारा इयत्ता पहिली ते पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना या बँकेने शिष्यवृत्ती योजना चालू केली आहे. यामध्ये गरजू आणि गुणवंत विद्यार्थी आपला अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

HDFC च्या योजनेद्वारे गरजू विद्यार्थ्यांना 75 हजार रुपये पर्यंत शिष्यवृत्ती प्राप्त होऊ शकते. जर आपल्याला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपण 31 डिसेंबरच्या आत हा अर्ज सादर करावा. या शिष्यवृत्ती संबंधित आवश्यक असणारी पात्रता अर्ज प्रक्रिया व शिष्यवृत्ती रक्कम याबद्दल आपण जाणून घेऊया.

शैक्षणिक पात्रता: या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी इयत्ता पहिली ते बारावी डिप्लोमा आयटीआय पदवी पदव्युत्तर पदवी हे विद्यार्थी अर्ज करू शकतात
शैक्षणिक गुणवत्ता: या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याला मागील शैक्षणिक वर्षात किमान 55(%) किंवा त्यापेक्षा जास्त गुण हवेत.
आर्थिक पात्रता: विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे व विद्यार्थी हा भारताचा नागरिक असावा.

अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे:
अर्ज करण्यासाठी आपल्याला अर्ज पत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, गुणपत्रिका, ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, शाळा किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र, बोनाफाईड आणि पालकांचा उत्पन्नाचा दाखला या गोष्टी आपणास लागतील.

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा..?
https://www.hdfcbankecss.com/ या वेबसाईटवर गेल्यानंतर Apply Now या बटनावर क्लिक करावे.

HDFC Bank Parivartan's Educational Crisis Scholarship Support (ECSS) Programme

त्यानंतर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल.

HDFC Bank Parivartan's Educational Crisis Scholarship Support (ECSS)

त्यानंतर परत आपला यांना वरती क्लिक करावे. त्यानंतर खालील विंडो ओपन होईल. आपण आपल्या पात्रतेनुसार त्या त्या विभागामध्ये अर्ज करू शकता.

HDFC Bank Parivartan's Educational Crisis Scholarship Support (ECSS)

अधिक माहितीसाठी खालील नंबर वर कॉल करा किंवा या मेल आयडीवर मेल करा.

Contact no. 011-430-92248 (Ext: 116) (Monday to Friday – 10:00AM to 06:00 PM (IST))

Email_Id: hdfcbankecss@buddy4study.com

Share this post:

Leave a comment