2023 या वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पिकांचे खूप नुकसान झालेले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, अशा काही शेतकऱ्यांचा ॲग्री पिक विमा हा त्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. परंतु काही शेतकऱ्यांच्या पिक विमा मध्ये अडचणी निर्माण झाल्यामुळे हा ॲग्री पिक विमा त्यांच्या खात्यावर अद्यापही जमा झालेला नाही. तरी ज्या शेतकऱ्यांचा ऍग्री पिक विमा त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही अशा शेतकऱ्यांनी कृषी सहायक अशी संपर्क साधला पाहिजे. जवळपास 94% शेतकऱ्यांना आजवर ॲग्री चा पिक विमा मिळाला असून ज्या शेतकऱ्याला आपला पिक विमा मिळालेला नाही अशांनी कृषी सहाय्यकाशी लवकरात लवकर संपर्क साधावा व आपल्या पिक विमा मध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर कराव्यात.
धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्यातील खरीप 2023 मध्ये विमा हप्ता भरलेल्या जवळपास 5 लाख 60 हजार शेतकऱ्यांपैकी पाच लाख 31 हजार शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी ॲग्री पीक विमा मिळालेला आहे परंतु पूर्वरेत जवळपास 28 हजार शेतकऱ्यांना हा पिक विमा मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे की या शेतकऱ्यांचा पिक विमा 19 डिसेंबर पर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून पिक विमा कंपन्या देण्यात आलेली आहे. तरी ज्यांचा पिक विमा आणखीन जमा झालेला नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या विभागाच्या कृषी जे काही कृषी विमा बद्दल अपडेट्स आहेत ते अपडेट्स घ्यावेत.
तसेच ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड अपडेट नाही किंवा ते बँकेच्या अकाउंटला लिंक नाही अशांनी लवकरात लवकर आपल्या अकाउंट हे लिंक करून घ्यावे.