सरकारी कामावरून जर आपण निवृत्त झाला असेल तर आपला निवृत्तीनंतर पेन्शन मिळते ही पेन्शन आपल्याला राज्य सरकार व केंद्र सरकारकडून मिळते. अलीकडेच महाराष्ट्र सरकार मध्ये पेन्शन मिळावे यासाठी खूप आंदोलन होत आहेत व कर्मचारी पेन्शन मिळावी यासाठी संपावर जात आहे परंतु या दरम्यान एक माहिती समोर येत आहे की, रेल्वेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना बंधन बँकेतून पेन्शन मिळणार आहे.
ही पेन्शन कोणाला मिळणार आहे..?
आपण किंवा आपल्या नातेवाईक जर रेल्वेमध्ये काम करत असतील आणि ते निवृत्त झाले असतील तर त्यांना ही पेन्शन बंधन बँकेतून मिळणार आहे, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. बंधन बँकेचे सरकार व्यवसायाचे प्रमुख देवराज सहा यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वे निदेशातील खूप मोठ्या प्रमाणात रोजगार देणारी एक यंत्रणा आहे. यामुळे या क्षेत्रात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना बंधन बँकेकडून स्पर्धात्मक दर व बँकेकडून विविध अशा सुविधा मिळतील.