बँकेमध्ये काम करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सरकार लवकरच मोठी खुशखबर देणार आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी जाहीर केले गेलेली आहे. परंतु प्रत्येक शनिवार सुट्टी मिळावी यासाठी सरकारकडे मागणी केलेली आहे आणि या मागणीसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.
चालू असलेले हिवाळी अधिवेशनामध्ये खासदार सुमित्रा वाल्मिकी यांनी याबद्दल सरकारला विचारले असता याचे उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितले की, दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी देण्याचा निर्णय ऑगस्ट 2015 मध्ये घेण्यात आला होता. परंतु प्रत्येक शनिवार स्पष्ट असे त्यांनी काही सांगितले नाही. परंतु याबद्दल सरकार प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.