ठाणे महानगरपालिकेमध्ये अधिव्याख्याता व वैद्यकीय अधिकारी अशा ४० रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रत्यक्ष मुलाखती द्वारा होणार आहे. या भरतीसाठी आपल्याला मुलाखतीच्या ठिकाणी 22 डिसेंबर 2023 रोजी सकाळी अकरा वाजता हजर राहायचे आहे.
1. पदाचे नाव: अधिव्याख्याता / Lecturer
शैक्षणिक पात्रता: 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एम.बी.बी.एस.) 02) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील- संबधित विषयातील पदव्युत्तर पदवी. (एम.डी/एम.एस./डी.एन.बी.) 03) राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) मान्यताप्राप्त शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाकडील सिनिअर रेसिडन्ट अथवा समकक्ष कामाचा किमान 01 वर्षाचा अनुभव. 04) राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले नियम व मानांकानुसार. 05) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
रिक्त जागा: 30
2. पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी / Medical Officer
शैक्षणिक पात्रता: 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एम.बी.बी.एस.) 02) राष्ट्रीय अयुर्विज्ञान आयोग अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील रजिस्ट्रेशन (permanent) असणे आवश्यक 03) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
रिक्त जागा: 10
परीक्षा शुल्क : नाही
वेतन : 75,000/- रुपये ते 1,50,000/- रुपये.
मुलाखतीचे ठिकाण: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
कृपया अधिक सविस्तर माहितीसाठी खालील वेबसाईट पहावी.
ऑफिशियल वेबसाईट: www.thanecity.gov.in