आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करणे हे आता गरजेचे झालेले आहे. तुम्ही कोणताही व्यवहार करत असाल तर त्यासाठी तुमचे आधार हे पॅनला लिंक असणे गरजेचे आहे. तुम्ही एखादी मालमत्ता किंवा जमीन घेण्याचा विचार करत असाल तर तुमचे व तुम्ही ज्याच्याकडून ही मालमत्ता विकत घेणार आहे अशा दोघांचेही पॅन कार्ड हे आधार कार्ड ला लिंक हवे. असे नसल्यास हे त्वरित करून घ्यावे. कारण जर आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक असेल तर तुम्हाला मालमत्ता खरेदीवर एक टक्के टॅक्स TDS लागतो, परंतु जर हे दोन्ही लिंक नसतील तर तुम्हाला एक टक्के ऐवजी 20% पर्यंत TDS भरावा लागू शकतो.
ज्या व्यक्तींनी 50 लाख रुपयांपेक्षा जास्त अशा मालमत्तेचे व्यवहार केले आहेत आणि त्यांचे पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक नाही अशांना आयकर विभागाकडून नोटीस जारी करण्यात येत आहेत. आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख ही 31 मार्च 2022 होती.
जरी काही कारणामुळे आपण आपल्या आधार कार्ड हे पॅन कार्ड ला लिंक केले नसेल तरी आपण आता विलंब शुल्क भरून आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक करू शकता. यासाठी एक हजार रुपये हे विलंब शुल्क आकारले जाते. तरी ज्यांनी पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक केले नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या आधार कार्ड फॅन्सी लिंक करून घ्यावे.