ZP Teacher Recruitment: उत्तर महाराष्ट्र मध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षकांची भरती करणे आवश्यक आहे. जवळपास साडेचार हजार हून अधिक शिक्षकांच्या जागा या रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून शिक्षक भरती करण्यासाठी संमती मिळाली आहे. या बातमीमुळे डीएड, बीएड, पदवीधारक उमेदवारांमध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला आहे.

राज्यामध्ये अनेक असे तरुण आहेत ज्यांनी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिले आहे, त्यानुसार शिक्षण ही घेतले आहे. आता फक्त ते वाट पाहत आहेत ते शिक्षक भरतीची. शेवटी त्यांच्या या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला असे म्हणावे लागेल. कारण लवकरच जवळपास साडेचार हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू होईल. ही भरती प्रक्रिया पवित्र संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. या भरती बाबतची जाहिरात लवकरात लवकर पवित्र संकेतस्थळावर जाहीर करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
TET व अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या द्वारे होणार शिक्षकांची निवड
शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी भरती प्रक्रियेचे आयोजन लवकरात लवकर केले जाणार आहे. यामध्ये खाजगी व सरकारी संस्था निहाय पवित्र संकेतस्थळावर स्वतंत्र जाहिराती सोडल्या जातील. तरी उमेदवारांनी पुढील प्रक्रियेच्या माहितीसाठी पवित्र हे संकेतस्थळ पहावे.