WRD Recruitment: मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली विविध पदांच्या 670 रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे. तरी या भरतीसाठी पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा व या संधीचा लाभ घ्यावा.
पदाचे नाव: जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब
शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने स्थापत्य म्हणजेच सिव्हील इंजीनियरिंगचा डिप्लोमा किंवा पदवी धारण केलेली असावी
वयाची अट: उमेदवाराचे वय 19 डिसेंबर 2023 रोजी 19 ते 38 वर्षे यादरम्यान असावे. SC/ST प्रवर्गासाठी ५ वर्ष सूट असेल व OBC साठी ३ वर्षाची सूट असेल.
परीक्षा शुल्क: १००० रुपये/-
मागासवर्गीय/अनाथ/दिव्यांग व आ.दु.घ. उमेदवारांसाठी ९०० रुपये/-
वेतन: नियमानुसार
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/npNV3
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/jxY68
Official Website: https://wrd.maharashtra.gov.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी https://cdn.digialm.com या वेबसाईटवर जायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जातील. हे अर्ज आपण 10 जानेवारी 2024 पर्यंत करू शकता. अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगावी. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.