Police Bharati: फेब्रुवारी च्या अगोदर पूर्ण होऊ शकते पोलीस भरती..! महाराष्ट्राला मिळणार नवे 13000 पोलीस..!बऱ्याच तरुणांचे लहानपणापासूनच स्वप्न असते की मोठे झाल्यानंतर मला पोलीस व्हायचं आहे, बरेच तरुण हे स्वप्न बाळगून अहोरात्र मेहनत करत आहेत. ते फक्त वाट पाहत आहेत की कधी एकदा पोलीस भरती निघते आणि मी त्या भरतीमध्ये सामील होऊन माझ्या कष्टाचे चीज करेल. तर या तरुणांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. आपण डोळ्यात तेल घालून पोलीस भरतीची वाट पाहत आहोत तर या नवीन वर्षामध्ये जवळपास 13000 नवीन पदांची भरती होणार आहे. या भरतीसाठी गृह विभागाने नियोजन चालू केले आहे राज्यातील 10 केंद्रामधील नवप्रविष्ठांचे प्रशिक्षण संपत आलेले आहेत. हे प्रशिक्षण फेब्रुवारी पर्यंत संपेल. तसेच निवडणुका आल्यामुळे आचारसंहिता ही लागू होतील. त्यामुळे आचारसंहिता जाहीर होण्याच्या अगोदरच ही भरती होण्याची घोषणा होऊ शकते अशी माहिती मिळत आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस संख्या यांचा रेशो खूपच कमी आहे.
लोकसंख्येचा विचार केला गेला तर एकूण लोक आणि एकूण पोलीस यांचा रेशो सध्या खूप कमी आहे. तसेच राज्यातील एकंदरीत परिस्थिती पाहता पोलिसांचे मनुष्यबळ हे कमी पडत आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एक आकृतीबंध तयार करण्यात आला आहे व त्यानुसार नवीन वाढीव पोलीस ठाणे व मनुष्यबळाची मागणी करणारे प्रस्ताव मागून घेतले आहेत याबद्दल नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात चर्चाही झाली आहे.
दरवर्षी रिक्त होणारी पदे व नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव
महाराष्ट्र मध्ये जवळपास दोन लाख पोलीस कॉन्स्टेबल आहे. त्यामध्ये दोन ते तीन टक्के लोक हे दरवर्षी सेवानिवृत्त होत असतात. परंतु त्या प्रमाणात भरती होत नाही. तसेच काही लोक स्वच्छ निवृत्ती घेतात, काही लोक काही आजाराने किंवा काही अपघाताने मृत्युमुखी पडतात. असे विविध कारणे आहेत, त्यामुळे पोलिसांची संख्या ही दरवर्षी रिक्त होत असते. परंतु त्याचप्रमाणे ही रिक्त संख्या भरून काढण्यासाठी भरती होणे हे गरजेचे असते. त्यामुळे सध्या रिक्त जागा व नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्तावही मागवले जात आहे. जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील लोकसंख्या ही वाढत आहे गुन्हेगारीचे प्रमाण हे वाढत आहेत. या सगळ्यांचा विचार करून लवकरच नवा आकृतीबंध तयार करून पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली जाऊन ही भरती होणार आहे.