केंद्र सरकारच्या मोदी सरकार पी एम किसान सन्मान निधी या स्कीमच्या अंतर्गत मिळणारा पुढील हप्ता हा फेब्रुवारी 2024 ते मार्च 2024 या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे.
PM Kisan Scheme 16th Installment: केंद्रातील मोदी सरकार गरिबांसाठी विविध अशा योजना राबवत असते. या योजनेमध्ये पी एम किसान सन्माननिधी स्कीम ही एक योजना आहे. या योजनेतून वर्षातून 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले जातात. जेव्हापासून ही योजना सुरू झाली आहे तेव्हापासून आतापर्यंत 15 हप्त शेतकऱ्यांना मिळालेले आहेत म्हणजे जवळपास 30 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. परंतु आता शेतकऱ्यांना पुढील हप्ता कधी मिळणार याबद्दल उत्सुकता लागलेली आहे.
तर आपल्याला असे कळवण्यात येत आहे की, पीएम किसान सन्मान निधी स्कीम कडून मिळणारा सोळावा हप्ताह फेब्रुवारी 2024 ते मार्च 2024 यादरम्यान मिळण्याची शक्यता आहे. परंतु सरकारकडून अशी कोणतीही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही.