Parbhani ZP Recruitment: परभणी जिल्हा परिषदेमध्ये विधिज्ञ पदाचे रिक्त जागा असून, ईमेल पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज 26 डिसेंबर 2023 पर्यंत स्वीकारले जातील. अर्ज करण्यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर आपल्याला अर्ज करायचा आहे.
पदाचे नाव: विधिज्ञ
शैक्षणिक पात्रता: उमेदवार हा एल एल बी (LLB) पदवीधारक असावा व त्याला कमीत कमी तीन वर्षाचा मा.न्याय पालिकेत काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
उमेदवाराचे किमान वय हे 24 वर्षे असावे.
उमेदवारास नियुक्तीनंतर प्रति प्रकरण पाच हजार रुपये, विधीज्ञ फी साडेतीन हजार रुपये व दीड हजार रुपये इतर खर्च असे मानधन अनुज्ञेय राहील.
ऑफिशिअल वेबसाईट: http://zpparbhani.gov.in/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://rb.gy/wacyos
ई-मेल आयडी: dyceogzppbn@gmail.com
अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपणास अर्ज हे ईमेल द्वारे करायचे आहेत, त्यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवावेत. हे अर्ज 26 डिसेंबर पर्यंत आपण पाठवू शकता. अर्ज करत असताना सोबत आवश्यक ती कागदपत्रे पाठवावीत. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.