MSRTC Recruitment: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये 145 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. ही भरती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा यांच्या अंतर्गत निघालेली आहे. त्यामध्ये शिकाऊ उमेदवारांच्या 145 रिक्त जागा आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे.
पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार
पदाचे नाव पात्रता व वेतनश्रेणीसाठी खालील तक्ता पहा.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वेतनश्रेणी | पद संख्या |
मोटार मेकॅनिक वाहन | कमीतकमी एसएसी पास असणे आवश्यक आहे. सरकारमान्य आयटीआय मधील २ यांचा मेंर्कानक मोटार व्हेईकल कोर्स (ट्रेड) उत्तीणं असणे आवश्यक आहे. | रु.८०५०.००/- [दरमहा] २ वर्ष | 40 |
मेकॅनिक डिझेल | कमीत कमी एसएससी पास असणे आवश्यक आहे. सरकारमान्य आयटीआय १ वर्षाचा मेकॅनिक डिझेल कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे | रु.७७००.००/- दरमहा १ वर्ष | 34 |
मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर | इयत्ता ८ यो उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सरकारमान्य आयटीआय १ वर्षाचा शिटमेटल/ ब्लॅकस्मिथ कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. | रु.७७००.००/- दरमहा १ वर्ष | 30 |
ऑटो इलेक्ट्रिशियन | कमीत कमी एसएससी पास असणे आवश्यक आहे. सरकारमान्य आयटीआय २ वर्षाचा इलेक्ट्रिशियन कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे | रु.८०५०.००/- : दरमहा २ वर्ष | 30 |
वेल्डर | कमीत कमी एसएससी पास असणे आवश्यक आहे. सरकारमान्य आयटीआय १ वर्षांचा वेल्डर कोर्स ट्रेड उत्तोणं असणे आवश्यक आहे | रु.७७००.००/- दरमहा १ वर्ष | 2 |
टर्नर | कमीत कमी एसएसी पास असणे आवश्यक आहे. सरकारमान्य आयटीआय मधील २ वर्षाचा टर्नर [ट्रेड] उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. | रु.८०५०.००/- [दरमहा] १ वर्ष | 3 |
प्रशितन व वातानुकुलिकरण | कमीत कमी एसएससी पास असणे आवश्यक आहे. सरकारमान्य आयटीआय १ वांचा प्रशितन व वातानुकुलिकरण कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे | रु.७७००.००/ दरमहा १ वर्ष | 6 |
पदसंख्या: १४५
शैक्षणिक पात्रता: यासाठी खालील तक्ता पाहावा
अर्ज पाठवण्याचा पत्ता: विभाग नियंत्रक कार्यालय, ७ स्टार बिल्डिंगच्या मागे, ST स्टँड च्या मागे, रविवार पेठ सातारा ४१५००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट: https://msrtc.maharashtra.gov.in/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/wLOW2
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत काढून दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहे.
अर्ज करण्या अगोदर सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक पहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे. अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, ती डाऊनलोड करून वाचावी.