WhatsApp Group Join Now

MIB Recruitment: माहिती आणि प्रसारण मंत्रालयामध्ये भरती प्रक्रिया चालू

MIB Recruitment: माहिती आणि प्रसारण मंत्रालयामध्ये भरती चालू असून, जर आपण पदवीधर आहात व तुम्हाला हिंदी सोबत एखादी भाषा येत असेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात. यामध्ये एकूण विविध पदांच्या पाच रिक्त जागा आहेत. या पाच रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ही 27 फेब्रुवारी 2024 आहे. तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा.

माहिती प्रसारण मंत्रालयामध्ये क्षेत्रीय अधिकारी आणि अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी या दोन रिक्त पदांच्या जागांसाठी भरती चालू आहे. त्यामध्ये क्षेत्रीय अधिकारी पदाच्या चार जागा आहेत. तर अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी या पदाची एक जागा आहे. या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 56 वर्षापर्यंत असावे. तसेच या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. यासाठी वेतन मान हे ६७,७०० ते २,०९,२०० रुपये इतके आहे. ही नोकरी आपण पाच ठिकाणी करू शकता, त्यामध्ये मुंबई, कटक, बेंगलोर, कोलकत्ता आणि गुवाहाटी या ठिकाणांचा समावेश आहे.

वय हे 56 वर्षापर्यंत असावे

शुल्क आकारण्यात आलेले नाही

वेतन मान हे ६७,७०० ते २,०९,२०० रुपये

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.

पद क्र.पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
1क्षेत्रीय अधिकारी (Regional Officers)1.मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष 2.हिंदीचे ज्ञान असावे आणि आणखी एक भारतीय भाषा04
2अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी (Additional Regional Officers)1.मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष 2. हिंदीचे ज्ञान असावे आणि आणखी एक भारतीय भाषा01
खाली दिलेल्या पत्त्यावर आपण पोस्टाने अर्ज करू शकता.
Under Secretary (Films), Ministry of Information and Broadcasting, ‘A’ Wing, Shastri Bhavan, New Delhi-110001
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा:https://shorturl.at/apQW2
ऑफिशियल वेबसाईट: https://mib.gov.in/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे हा अर्ज करत असताना सर्व कागदपत्रे अर्जासोबत व्यवस्थित जोडावे अर्ज हा 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोहोचला पाहिजे या हिशोबाने पाठवावा जर आपण हा अर्ज स्वतः जाऊन करू इच्छिता तर आपण तो समक्ष ही सादर करू शकता. अर्जामध्ये दिलेली माहिती पूर्ण भरावी कारण अपूर्ण अर्जांचा विचार केला जात नाही. आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

Share this post:

Leave a comment