Malegaon Mahanagarpalika Recruitment: मालेगाव महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघालेली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामध्ये एकूण 98 रिक्त जागांसाठी अर्ज मागविलेले आहेत. हे अर्ज आपल्याला 8 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे.
पदाचे नाव, रिक्त जागा व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पाहावा.
पद क्र. | पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
1 | वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) | MBBS | 36 |
2 | स्टाफ नर्स (महिला | JNM / बी.एस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी) | 28 |
3 | स्टाफ नर्स (पुरुष) | JNM / बी.एस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी) | 04 |
4 | एमपीडब्ल्यू (पुरुष) | विज्ञान मध्ये 12 वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम | 30 |
अर्ज करण्यासाठी 150 रुपये अर्जाची फी आहे. राखीव प्रवर्गासाठी हे 100 रुपये असेल.
पगार 8000 रुपये ते 60, 000 रुपये पर्यंत आहे.नोकरीचे ठिकाण हे मालेगाव नाशिक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: आरोग्य विभाग, जुने सभागृह, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/bguV0
ऑफिशियल वेबसाईट: https://arogya.maharashtra.gov.in
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. दिलेल्या पत्त्यावर आपल्याला अर्ज पाठवायचे आहेत. हे अर्ज 8 जानेवारी 2024 पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत. अर्ज पाठवत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावीत. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.