Mahavitaran Job: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी, लिमिटेड मध्ये 5347 जागांची मेगा भरती निघाली असून, यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. यामध्ये विद्युत सहाय्यक या पदाच्या या सर्व जागा आहेत, जे उमेदवार बारावी पास असतील असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. यामध्ये अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणखीन जाहीर करण्यात आलेली नाही. तरी शेवटच्या तारखेची वाट न बघता उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावेत व तयारीला लागावे.
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
विद्युत सहाय्यक / Electrical Assistant | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण | ५३४७ |
या पदासाठी वेतन हे १५ हजार रुपये ते १७ हजार रुपये पर्यंत मिळेल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://www.mahadiscom.in/en/home/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/aEGOP
ऑफिशियल वेबसाईट: https://www.mahadiscom.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी वर दिलेल्या लिंक ला क्लिक करून रजिस्ट्रेशन करावे व आपला अर्ज भरावा. अर्ज भरत असताना सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. परंतु शेवटच्या तारखेची वाट न बघता आपण हे अर्ज भरून घ्यावेत. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.