WhatsApp Group Join Now

LPG Price Down..! या ग्राहकांसाठी LPG सिलेंडर झाले स्वस्त.

LPG Price Down: आजच म्हणजे शुक्रवारी 22 डिसेंबरला सरकारी तेल विपणन कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज पासून म्हणजे 22 डिसेंबर 2023 पासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत.

व्यवसायिक एलपीजी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती सुमारे 40 रुपयांनी कमी झाल्या आहेत. प्रत्येक ग्राहकाला 40 रुपयांचा फायदा होणार आहे. परंतु घरगुती एलपीजी सिलेंडरच्या बाबतीत कोणताही नफा होणार नाही याची नोंद घ्यावी.

कधीपासून लागू होणार नवे एलपीजीचे दर..?

मिळालेल्या माहितीनुसार OMC नंबर 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 39.50 उतरली आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी सांगितल आहे की, या किमती आज पासूनच लागू होतील म्हणजे आजपासून देशातील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 39.50 रुपयांनी स्वस्त मिळतील. तरी ग्राहकांनी याची नोंद घ्यावी.

LPG Price Reduced

एलपीजी(LPG) च्या घरगुती सिलेंडर किमतीमध्ये मध्ये कोणताही बदल नाही

देशातील बरीच जनता आहे जी एलपीजी सिलेंडरचा वापर करते. घरगुती एलपीजीच्या किमतीमध्ये बऱ्याच वेळा चढ-उतार होत असतात. परंतु या माहितीनुसार घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणतीही घसरण झालेली नाही. सामान्य जनतेला अपेक्षा आहे की घरगुती एलपीजी सिलेंडर च्या किमतीही कमी झाल्या पाहिजे.

Share this post:

Leave a comment