शिवसेनेला काँग्रेसबरोबर युतीची किंमत मोजावी लागेल: नितीन गडकरी!!

महाराष्ट्रात शिवसेना आणि कॉंग्रेसमधील युती सरकार फार काळ चालणार नाही, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. आगामी काळात शिवसेनेला या युतीची किंमत मोजावी लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे. निवडणुकीत युती असलेल्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षाशी आघाडी करून सत्ता स्थापन करणं लोकशाहीसाठी घातक आहे, असं सांगतानाच महाराष्ट्रातील काँग्रेस-शिवसेनेचं आघाडी सरकार जास्त दिवस चालणार नाही.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी हा इशारा दिला आहे. निवडणुकीत एका पक्षाशी युती करायची आणि निवडणुकीनंतर इतर पक्षाशी आघाडी करायची हे सैद्धांतिकदृष्ट्या योग्य नाही. लोकशाहीसाठीही हे बरोबर नाही. शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात मतं मागितली होती. त्यामुळे जनतेने भाजप-शिवसेनेला कौल दिला. पण नंतर केवळ मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने भाजपची साथ सोडली. हे लोकांनाही आवडलेलं नाही, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं हिंदूत्व आमच्यासाठी सर्वोच्च आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी या हिंदुत्वाला मानत नाही. शिवसेनेच्या याच लोकांसोबतच्या आघाडीला काही नैतिकता नाही. त्यामुळे ही आघाडी दीर्घकाळ टीकणार नाही. ही संधीसाधूंची आघाडी असून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Share this...

marathikatta

Leave a Reply

Your email address will not be published.