न्युझिलंडविरुदधच्या कसोटी संघातुन बेअरस्टोला वगळले तर टी-२० मालिकेसाठी रुट, स्टोक्स, बटलर व मोईनला विश्रांती!!

२०१९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात यजमान इंग्लंडने विजेतेपदाला गवसणी घातली होती. इंग्लंडला विजेतेपद मिळवुन देण्यात इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोने ११ सामन्यांत २ शतक व २ अर्धशतकांसह ४८.३६ च्या सरासरीने ५३२ धावा काढत महत्त्वाची भुमिका निभावली. यशस्वी विश्वचषकानंतर इंग्लंडकडुन अॅशेस मध्ये अशाच कामगिरीची अपेक्षा होती पण ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्हन स्मिथ व गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलाच घाम फोडला होता. शेवटी मालिका २-२ ने बरोबरीत राहिली पण विश्वचषक गाजवणाऱ्या जॉनी बेअरस्टोला ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत एका अर्धशतकाच्या सहाय्याने २३.७७ च्या सरासरीने फक्त २१४ धावा करता आल्या.

      ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-२ ने बरोबरीत सोडल्यानंतर इंग्लंडने न्युझिलंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० व कसोटी मालिकेसाठी संघांची घोषणा करण्यात आली आहे त्यात कसोटीत यष्टिरक्षकाची भुमिका बजावणाऱ्या जॉनी बेअरस्टोला कसोटी संघातुन वगळण्यात आले आहे पण त्याला टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे. बेअरस्टोला वगळल्यामुळे जोस बटलर कसोटीत यष्टिरक्षकाची भुमिका निभवेल तर डॉम सिबली व झॅक क्रावलीची कसोटीत तर टॉम बॅन्टन व पॅट ब्राऊनची टी-२० मध्ये पहिल्यांदाच वर्णी लागली आहे. वॉर्विकशायरकडुन खेळताना चॅम्पियनशिपमध्ये १३२४ धावा फटकावणाऱ्या सिबलीला कामगिरीचे बक्षिस भेटले.

      दुखापतीमुळे अॅशेस मालिकेतील सामन्यांना मुकावे लागल्यानंतर न्युझिलंड दौऱ्यासाठीच्या संघासाठी विचार करण्यात आलेला नाही त्याच्या जागी लॅकशायरच्या सकिब महमुदची तर मोईन अलीच्या जागी पहिल्यांदाच मॅट पार्किन्सनची दोन्ही संघात वर्णी लागली. सततच्या क्रिकेटमुळे इंग्लंडने न्युझिलंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी बटलर, जेसन रॉय, जो रुट, मोईन अली व बेन स्टोक्सला विश्रांती दिली आहे.

टी-२० संघ:- इयॉन मॉर्गन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, टॉम बॅन्टन, सॅम बिलिंग्स, पॅट बाऊन, सॅम करण, टॉम करण, जो डेन्ली, लेविस ग्रेगोरी, ख्रिस जॉर्डन, साकिब महमुद, डेविड मलान, मॅट पार्किन्सन, आदिल राशिद, सेम्स विन्स

कसोटी संघ:- जो रुट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रॉवली, सॅम करण, जो डेन्ली, जॅक लिच, साकिब महमुद, मॅथ्यु पार्किन्सन, वोली पोप, डोमिनिक सिब्ली, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स

टी-२० मालिका

  • पहिला टी-२० – १ नोव्हेंबर २०१९, ख्रिस्टचर्च
  • दुसरा टी-२० – ३ नोव्हेंबर २०१९, वेलिंग्टन
  • तिसरा टी-२० – ५ नोव्हेंबर २०१९, नेल्सन
  • चौथा टी-२० – ८ नोव्हेंबर २०१९, नेपियार
  • पाचवा टी-२० – १० नोव्हेंबर २०१९, ऑकलंड

कसोटी मालिका

  • पहिली कसोटी – २१ नोव्हेंबर २०१९, माऊंट मोंगनूई
  • दुसरी कसोटी – २९ नोव्हेंबर २०१९, हॅमिल्टन

शंतनू कुलकर्णी

Share this...

marathikatta

Leave a Reply

Your email address will not be published.