WhatsApp Group Join Now

Karagruh Vibhag Bharati: कारागृह विभाग, महाराष्ट्र शासन मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती

Karagruh Vibhag Bharati: महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागामध्ये विविध अशा 25 पदांचा रिक्त जागेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. हे अर्ज आपण एक जानेवारी 2024 ते 21 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये भरू शकता. अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने चा वापर करायचा आहे. यामध्ये लिपिक वरिष्ठ लिपिक, शिक्षक, लघुलेखक निम्न श्रेणी, विणकाम निर्देशक, चर्मकला निदेशक, यंत्र निदेशक इत्यादी अशा एकूण 25 रिक्त पदांसाठी एकूण 255 जागा आहेत.

जे उमेदवार http://mahaprisons.gov.in/Site/Home/Index.aspx या पदासाठी इच्छुक असतील त्यांनी या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे.

पदाचे नाव, एकूण पदे, वेतनश्रेणी यासाठी खालील तक्ता पाहावा.

Karagruh Vibhag Bharati

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी होण्याची दिनांकदिनांक 1 जानेवारी 2024 दुपारी 12 वाजल्यापासून
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीखदिनांक 21 जानेवारी 2024
ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीखदिनांक 21 जानेवारी 2024
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/diqQT
ऑफिशियल वेबसाईट: http://mahaprisons.gov.in/Site/Home/Index.aspx

या भरतीसाठी अर्ज कसा करावा:

या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यामध्ये विविध अशी 25 पदे आहेत. त्यामुळे अर्ज करत असताना अर्ज हे काळजीपूर्वक करावेत. अर्ज भरत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवावी. अर्ज भरताना लागणारे कागदपत्रे व स्वतःचा फोटो, सही यांची सॉफ्ट कॉपी सोबत ठेवावे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 आहे, परंतु शेवटच्या तारखेची वाट न बघता अर्ज हे लवकर भरावे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.

या परीक्षेसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा जर आपण पूर्ण करू शकत असाल, तर आपल्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

Share this post:

Leave a comment