Government Schemes : महाराष्ट्र शासन नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असत. या योजना आणत असताना समाजातील प्रत्येक घटकांचा विचार यामध्ये केला जातो. अशीच एक योजना महाराष्ट्र शासनाने आणलेले आहे, यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी एक नवीन योजना चालू केली आहे. त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना ऑटो रिक्षा मिळणार आहे. परंतु त्यासाठी काही अटी व शर्ती आहेत. तसेच अर्ज कसा करावा..? या योजनेबद्दल खाली माहिती दिलेली आहे. आपण जर पात्र असाल तर अर्ज करू शकता किंवा आपल्या ओळखीचे कोणी असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या.
या योजनेसाठी अर्जदाराने खालील पात्रता पूर्ण केलेली असावी.
तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर अर्ज करू शकता.
अर्ज करण्यासाठी दिव्यांगाचे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.
ज्या अर्जदारांना 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व आहे, अशाच अर्जदारांना या योजनेचा लाभ घेता येईल.
अर्ज करण्यासाठी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
मतदान कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटो, दिव्यांगाचे प्रमाणपत्र, मोबाईल नंबर
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://evehicleform.mshfdc.co.in/