GMC Dhule Bharti 2024: श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे(GMC Dhule) येथे मोठी भरती निघाली असून, यामध्ये एकूण 137 रिक्त जागा आहेत. यामध्ये विविध अशा 26 रिक्त पदांसाठी या जागा आहेत. यामध्ये प्रयोगशाळा परिचर, शिपाई, पहारेकरी, प्राणी गृह परिचर, दप्तरी, परिचर, सफाईगार, शिंपी, शव विच्छेदन परचर, उद्वाहन चालक, वस्तीगृह सेवक, कक्षसेवक, रुग्णपट वाहक, न्हावी, धोबी, चौकीदार, प्रयोगशाळा परिसर, माळी, कक्षसेवक, बाह्य रुग्ण विभाग सेवक, सुरक्षा रक्षक, पहारेकरी, प्रमुख स्वयंपाकी, सहाय्यक स्वयंपाकी, स्वयंपाकी सेवक, क्ष किरण सेवक या पदांसाठी रिक्त जागा आहेत. या पदांसाठी पात्रता ही सातवी पास ते दहावी पास आहे. ही पात्रता पदारनुसार आहे. तरी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत अशा उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 जानेवारी 2024 आहे. अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.
पदनाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | जागा |
प्रयोगशाळा परिचर / Laboratory Attendant | 07 |
शिपाई / Laboratory Attendant | 09 |
पहारेकरी / Laboratory Attendant | 05 |
शवविच्छेदन परिचर / Autopsy Attendant | 03 |
प्राणी गृह परिचर / Animal House Attendant | 01 |
दप्तरी / Clerk | 01 |
परिचर / Attendant | 02 |
सफाईगार / Sweeper | 26 |
शिंपी / Tailor | 01 |
दंत परिचर / Dental Attendant | 01 |
उदवाहन चालक / Transport Driver | 01 |
वस्तीगृह सेवक/ मेस सेवक / Dormitory House Attendant/Mess Attendant | 01 |
कक्षसेवक / Room Attendant | 31 |
रुग्णपट वाहक / Medical Record Carrier | 02 |
न्हावी / Barber | 03 |
धोबी / Washerman | 04 |
चौकीदार / Watchman | 03 |
प्रयोगशाळा परिचर / Laboratory Attendant | 01 |
माळी / Gardener | 01 |
कक्षसेवक/कक्ष आया/महिला आया / Room Attendant/Room Nanny/Lady Nanny | 09 |
बाहयरुग्ण विभाग सेवक / Out Patient Ward Attendant | 05 |
सुरक्षारक्षक/पहारेकरी / Security Guard/ Watchman | 03 |
प्रमुख स्वयंपाकी / Head Cook | 04 |
सहायक स्वयंपाकी / Assistant Cook | 02 |
स्वयंपाकी सेवक / Cook Attendant | 05 |
क्षकिरण सेवक / X-Ray Attendant | 03 |
परीक्षा शुल्क: या भरतीसाठी परीक्षा शुल्क एक हजार रुपये आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व दिव्यांग उमेदवारांना 900 रुपये, माजी सैनिकांना कोणतेही परीक्षा शुल्क नाही.
ऑफिशियल वेबसाईट: https://sbhgmcdhule.org/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/amvNU
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
त्या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जांचा विचार केला जाईल. अर्ज भरत असताना काळजीपूर्वक भरावे. अर्ज भरताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवावेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
GMC Dhule Bharti 2024: Shree Bhausaheb Hire Government Medical College, Dhule has released a big recruitment and there are total 137 vacancies. There are 26 vacancies for various posts. Eligibility for these posts is 7th pass to 10th pass. This eligibility is rank wise. However, those candidates who are interested and eligible should apply for this recruitment as soon as possible. Last date to apply is 24 January 2024. Applications are to be made online.