BOAT Recruitment: प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण मंडळ, मुंबई येथे भरती निघाली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये वरिष्ठ लघुलेखक आणि प्रशिक्षण संचालकांचे वैयक्तिक सहाय्यक या पदासाठी १ रिक्त जागा आहे. जर आपले शिक्षण दहावी किंवा समतुल्य असेल आणि जर तीन वर्षाचा अनुभव असेल, तर आपण या भरतीसाठी पात्र आहात. या भरतीसाठी वयाची अट 19 जानेवारी 2024 रोजी 35 वर्षापर्यंत असावी. जर आपले वय 35 च्या पुढे असेल तर आपण या भरतीसाठी अपात्र आहात. या भरतीसाठी तीनशे रुपये परीक्षा शुल्क आहे. तसेच पगारही नियमानुसार दिला जाईल. आपल्या अर्जावरून आपणास 29,200 ते 92,300 रुपये इतका पगार मिळू शकतो. ही भरती मुंबई येथे निघालेली आहे जर आपण इच्छुक असाल तर दिनांक 19 जानेवारी 2024 पर्यंत आपल्याला पोस्टाद्वारे किंवा समक्ष भेटून अर्ज करायचा आहे. अर्ज करत असताना काळजी घेऊन सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडावे. कारण अर्ज जर अर्धवट असेल तर तो स्वीकारला जाणार नाही.
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वरिष्ठ लघुलेखक आणि प्रशिक्षण संचालकांचे वैयक्तिक सहाय्यक | दहावी उत्तीर्ण व तीन वर्षाचा अनुभव आवश्यक | 01 |
परीक्षा शुल्क: तीनशे रुपये
पगार: नियमाप्रमाणे
नोकरीचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा: https://shorturl.at/jpxJT
ऑफिशियल वेबसाईट: http://www.apprentice-engineer.com/
अर्ज पाठवायचा पत्ता: The Director, Board of Apprenticeships (West Region), 2nd Floor, New Administrative Building, NSTI Campus, V.N. Purv Marg, Sion (East), Mumbai-400 022.
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हे अर्ज 19 जानेवारी 2024 पर्यंत पोहोचतील अशा हिशोबाने आपल्याला पाठवायचे आहे. हा अर्ज आपण दिलेल्या बद्दल पोस्टाने पाठवू शकता किंवा समक्ष जाऊन तेथे सादर करू शकता. अर्ज कोठे पाठवायचा याचा पत्ता वर दिलेला आहे. अर्ध सोबत आवश्यक ती कागदपत्रे व्यवस्थित जोडावी. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.