Army Law College Bharti: आर्मी लॉ कॉलेजमध्ये भरती निघाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती पुणे येथील कॉलेज साठी असून यासाठी एकूण 2 रिक्त जागा आहेत. यासाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होईल. हे मुलाखत 6 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहावे.
पदाचे नाव कारकून (Clerk) असून यासाठी एकूण 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता: उमेदवार हा पदवीधर असावा किंवा पदवीधर सैन्य म्हणजेच माझी सैनिक. त्याचबरोबर त्याला पंधरा वर्षांचा लिपिक SD या पदाचा कामाचा अनुभव असावा.
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. तसेच नोकरी करण्याचे ठिकाण हे महाराष्ट्रातील पुणे हे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नियमा प्रमाणे वेतन मिळेल.
उमेदवारांनी मुलाखतीसाठी खालील पत्यावर उपस्थित राहायचे आहे.
Army Law College Campus at Kanhe, Pune.
ऑफिशियल वेबसाईट: https://alcpune.com/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला थेट मुलाखत असल्यामुळे, उमेदवारांनी 6 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहावे. मुलाखतीस हजर राहत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवावे. सविस्तर जाहिरात आवश्य वाचावी.