महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन – मित्र या संस्थेमध्ये यंग प्रोफेशनल या पदासाठी 22 रिक्त जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2024 सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा फायदा करून घ्यावा.
यामध्ये यंग प्रोफेशनल या पदासाठी कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, कृषी व तत्सम विषयातील पदवीसह संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. उमेदवाराने त्या क्षेत्रामध्ये किमान दोन वर्ष काम केलेले असावे.
पदाचे नाव, विकास क्षेत्र व पदसंख्या यासाठी खालील तक्ता पाहावा:
कमाल वयोमर्यादा: दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी 28 वर्षे असावी.
मानधन: 70 हजार रुपये प्रति महिना
शुल्क : शुल्क नाही
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/bryDR
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/qDSZ2
ऑफिशियल वेबसाईट: https://mahades.maharashtra.gov.in/home.do?lang=mr
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पोर्टल द्वारे केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आठ जानेवारी 2024 आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.