इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठांमध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती निघालेली आहे. यामध्ये कनिष्ठ सहाय्यक कम टायपिस्ट आणि लघुलेखक या दोन पदांच्या 102 जागांसाठी ही भरती आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 26 डिसेंबर 2023 पर्यंत या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. पूर्वी ही दिनांक 21 डिसेंबर 2023 होती. परंतु अर्ज भरण्यासाठी दिवसाची मुदत वाढ करण्यात आलेली आहे.
रिक्त पदाचे नाव, रिक्त जागा व शैक्षणिक अर्हता यासाठी खालील तक्ता पाहावा.
पद क्र | पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयाची अट | जागा |
1 | कनिष्ठ सहाय्यक–कम टायपिस्ट / Junior Assistant–cum Typist | 1. 10+2 किंवा समतुल्य 2. टायपिंग चाचणी संगणकावर इंग्रजी मध्ये 40 श.प्र.मि. किंवा हिंदी मध्ये 35 श.प्र.मि. प्राधान्य : मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून बॅचलर पदवी | 18 – 27 वर्षे | 50 |
2 | लघुलेखक / Stenographer | 1. 10+2 किंवा समतुल्य 2. टायपिंग चाचणी संगणकावर इंग्रजी मध्ये 40 श.प्र.मि. किंवा हिंदी मध्ये 35 श.प्र.मि. प्राधान्य : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून बॅचलर पदवी 02) संगणकाचे ज्ञान. | 18 – 30 वर्षे | 52 |
परीक्षा शुल्क: १००० रुपये/-
SC /ST/महिला ६००/- रुपये
PwBD निःशुल्क
वेतनमान: १९,९०० ते ८११००/-
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://recruitment.nta.nic.in/WebInfo/Page/Page?PageId=1&LangId=P
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/jtHI0
ऑफिशियल वेबसाईट: http://www.ignou.ac.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पोर्टल द्वारे केलेलेच अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. पूर्वी हे अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 21 डिसेंबर होती परंतु आता आपण 26 डिसेंबर 2023 पर्यंत हे अर्ज भरू शकता.
अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगावी.
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.