आज आपण एका अशा उत्सवाबद्दल जाणनार आहोत जो फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात तसेच जगात सुद्धा साजरा केला जातो. गणेश चतुर्थी असे ह्या उत्सवाचे नाव आहे.

चौसष्ट कला आणि चौदा विद्याचा अधिपती अशी या देवतेची ओळख आहे.

कुठल्याही कार्याआधी ज्या देवतेचे पूजन केले जाते ती ही देवता जिला कोणी गणेश, गजानन, वक्रतुंड असा अनेक नावांनी परिचित असलेल्या या गणपती बाप्पांबद्दल जाणून घेऊया.

भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते चतुर्दशी आशा ह्या १० दिवसांच्या  कालावधीत बाप्पांचे आगमन होते.

पौराणिक कथेनुसार जेव्हा माता पार्वती स्नानास जातात  तेव्हा द्वारावर पहारेकरी म्हणून मातीच्या लेपना पासून तयार केलेल्या ज्याला आपल्या शक्तीने प्राण फुंकून जीवित केलेल्या त्या रुपाला पहारेकरी ठेवून स्नानास जातात.

थोड्या वेळात भगवान शंकर ह्यांचे तेथे आगमन होते.

माता पार्वतीच्या आदेशानुसार पहारेकरी आपल काम करतो.तो भगवान शंकरांना आत जाण्यापासून रोखतो.

त्यामुळे भगवान शंकर क्रोधीत होतात व त्या पहारेकरयाचा शिरच्छेद करतात.

माता पार्वती स्नानाहून आल्यानंतर घडलेला प्रकार समजतो व त्या क्रोधीत होतात.भगवान शंकर त्यांचा राग शमवण्यासाठी  आपल्या सेवकांना आदेश देतात जिथे माझ्या अस्त्राने ज्याचा शिरच्छेद झाला असेल त्याचे शीर घेऊन यावे असे सांगून शंकर आपले अस्त्र सोडतात.

सेवकांना जंगलात भगवान शंकर यांचे अस्त्र आणि सोबत एका हत्तीचे शिर आढळून येते.ते घेऊन सेवक परत येतात व भगवान शंकर ते शिर त्या धडावर बसवतात. त्या दिवसापासून त्याला गजानन असे नाव पडले.

गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे मुख .तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी होता म्हणून गणेश उत्सव सुरू झाला. 

भगवान शंकराने त्याला गणांचा ईश म्हणून संबोधले म्हणून गणेश चतुर्थीला महत्व आले.

तर अशाप्रकारे गणेश उत्सवाला सुरवात झाली .ज्याची वाट लहानपासून थोरांपर्यंत सगळेच बघत असतात असा हा उत्सव.

Share this...