झीरो ते हिरो ते परत झिरो!

शाहरुख खान म्हणजे रोमान्सचा राजा, बादशहा, किंग इतकं! पण अलीकडचा काही काळात  शाहरुख खान आणि त्याचा स्टारडम कमी होत आहे असा वाटतं. त्याचे कारण म्हणजे गेल्या ३ वर्षात त्याचे आलेले सिनेमे जसे चालायला हवे तसे चालत नाहीत असं दिसतंय. याची सुरवात झाली ते त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाला पार्टीत त्याचा काही असहिष्णुविधानावरून असो !त्या गोष्टी जाऊ दे. ‘झिरो’ जर हिट ठरला नाही तर कदाचित मला पुढील सहा ते दहा महिने काम मिळणार नाही,  असं शाहरुख काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हणाला होता.  त्याच्या सारख्या सुपरस्टारच्या डोक्यात हा विचार का बरं आला असेल याचं उत्तर ‘झिरो’ पाहिल्यावर मिळतं. बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा चित्रपट हे कथानकावर नाही तर  त्यात काम करणाऱ्या हिरोच्या स्टारडमवर चालायचे, सुपरहिट व्हायचे. मात्र आता तो काळ गेला. प्रेक्षकांची आवड आता बदलत चालली आहे. प्रेक्षक हे चांगला आशय  असणाऱ्या चित्रपटाच्याशोधात असतात आणि याच आशयची कमतरता ‘झिरो’ मध्ये आहे. शाहरुख, अनुष्का, कतरिना अशी तगडी स्टारकास्ट असतानाही या चित्रपटात बऊआची ‘जादू’  चालल्यासारखं वाटतं नाही. ‘झिरो’त रोमँटिक हिरो शाहरुखनं साकारलेली भूमिका ही त्यानं साकारलेल्या इतर  भूमिकेपेक्षा खूपच वेगळी आहे. शाहरूख या चित्रपटात काहीतरी वेगळं करतोय त्यामुळे चाहत्यांना त्याच्या ‘झिरो’कडून फार अपेक्षाही आहे. मात्र ‘झिरो’ हा

Read more