ताहिर व एन्गीडीच्या गोलंदाजीनंतर क्विंटन डी कॉक आणि फाफ ड्युप्लेसिसची शानदार फलंदाजी, दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या सामन्यांत ८ गड्यांनी विजय!!

कसोटी मालिकेत २-० ने विजय संपादन केल्यानंतर श्रीलंका संघाचा आत्मविश्वास वाढला होता त्यामुळे ५ सामन्यांच्या मालिकेत ते दक्षिण आफ्रिकी संघाला जोरदार लढा देतील असा क्रिडा रसिकांना विश्वास होता तर कसोटी मालिकेतील पराभवाचा बदला घेण्यासा आफ्रिकेचा संघ आतुर होता. आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसने नाणेफेकीचा कौल जिंकत फ्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करणारा श्रीलंकेचा ओशिंदो फर्नांडो आपला पदार्पणाचा सामना खेळत होता तर आफ्रिकेकडुन अन्रिच नॉर्टजे पदार्पणाचा सामना खेळत होता.

       कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत लुंगी एन्गीडीने श्रीलंकेचे सलामीवीर निरोशन डीकवेला आणि उपुल थरंगाला २३ धावांत बाद करत आफ्रिकेला शानदार सुरुवात करुन दिली. दोन्ही सलामीवीर झटपट गमावल्याने कुसल परेरा आणि पादर्पणाचा सामना खेळणाऱ्या  ओशिंदो फर्नांडोवर संघाची जिम्मेदारी आली होती. या दोघांनी कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गीडीविरुद्ध सावध पवित्रा घेतला होता. खेळपट्टीवर जम बसल्यानंतर दोघांनी आपल्या म्यानातील फेटके खेळण्यास सुरुवात केली महत्त्वाचे म्हणजे या दोघांनी संघाची धावगती ५ च्या आसपास ठेवली होती. दोघेही संघाला मोठी धावसंख्या उभआरुन देतील असे वाटत असताना इम्रान ताहिरने परेराला पायचित करत संघाला मोठे यश मिळवुन दिले तर पदार्पणाता अर्धशतक कराण्याची फर्नांडोची संधी सुद्धा हुकली तो ४९ धावांवर धावबाद झाला. २ धावांत जम बसलेले खेळाडु बाद झाल्याने श्रीलंकेचा संघ पुन्हा एकदा दबावात होता.

      आता डाव सावरण्याची जिम्मेदारी होती ती कुसल मेंडीस आणि धनंजय डी सिल्वावर. इम्रान ताहिर शानदार गोलंदाजी करत होता त्यामुळे मेंडीस आणि सिल्वाने ताहिर विरुद्ध सावध पवित्रा घेतला होता.  त्यातच कुसल मेंडीसने एकदिवसीय कारकिर्दीतले १३ वे अर्धशतक साजरे केले. दोन झटपट गडी गमावल्यांनतर पुन्हा एकदा मेंडीस आणि सिल्वाच्या जोडीने शानदार भागिदारी करत ३६.४ षटकांत संघाची धावसंख्या २०० च्या जवळ पोहचवली होती पण पुन्हा एकदा ताहिरनेच ९४ धावांची भागिदीर फोडत डी सिल्वाला ३९ धावांवर यष्टिचीत केले त्यानंतर ३९ व्या षटकांत ताहिरनेच मेंडीसला ६० धावांवर बाद करत श्रीलंका संघाची अवस्था ६ बाद २१० केली होती. आता तळाचे फलंदाजी आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर किती तग धरतात हे पाहणे महत्त्वाचे होते पण त्यातही कर्णधार मलिंगा सोडल्यास दुसरा कोणताही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठु शकला नाही आणि श्रीलंकेचा डाव ४७ षटकांत २३१ धावांत संपुष्टात आला. आफ्रिकेकडुन इम्रान ताहिर आणि लुंगी एन्गिडीने प्रत्येकी ३ तर रबाडा आणि नॉर्टजेने प्रत्येकी १ गडी बाद केला.

      सध्याच्या काळात २३२ धावांचे आव्हान जास्त नव्हते पण तरीही दक्षिण आफ्रिकेला क्विंटन डी कॉक आणि रीझा हेंड्रीक्सकडुन चांगल्या सलामीची अपेक्षा होती पण दुसऱ्या षटकांत विश्वा फर्नांडोने रीझा हेंड्रीक्सला बाद करत श्रीलंकेला पहिले यश मिळवुन दिले. पण त्यानंतर आलेल्या फाफ ड्यु प्लेसिस आणि क्विंटन डी कॉकने श्रीलंकेच्या गोलंदाजांवर तुटुन पडले. दोघेही शानदार लयीत दिसत होते आणि त्यांची भागिदारी श्रीलंकेच्या कर्णधार लसिथ मलिंगाची परेशानी वाढवत होते. बघता-बघता डी कॉक आणि ड्यु प्लेसिस विजयाकडे आगेकुच करत होते. त्यातच ड्यु प्लेसिसने ३२ वे अर्धशतक झळकावले त्यानंतर डी कॉकने ही आपले १९ वे अर्धशतक साजरे केले.

         ड्यु प्लेसिस आणि क्विंटन डी कॉकने दुसऱ्या गड्यासाठी १०० धावा जोडल्या होत्या त्यामुळे सामन्यांवर आफ्रिकेचेच वर्चस्व होते. श्रीलंकेला सामन्यांत परतण्यासाठी झटपट गडी बाद करण्याची आवश्यकता होती पण ड्यु प्लेसिस आणि क्विंटन डी कॉकने श्रीलंकेच्या गोलंदाजांना संधीच दिली नाही. आफ्रिकेच्या १५० धावा झाल्या असताना डी कॉक ८१ धावांवर अकिला धनंजय गोलंदाजांवर पायचित झाला. डी कॉक बाद झाल्यानंतरही ड्यु प्लेसिस खेळपट्टीवर टिकुन होता आणि ड्यु प्लेसिसने ११ वे शतक साजरे केले. डी कॉक बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या वॅन डर ड्युसनने ड्यु प्लेसिसला मह्त्त्वाची साथ दिली आणि ३८.५ षटकांत २ गडी गमावत २३२ धावांच आव्हान पार करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. ड्यु प्लेसिस ११२ तर वॅन डर ड्युसन ३२ धावांवर नाबाद राहिले. श्रीलंकेकडुन विश्वा फर्नांडो आणि अकिला धनंजयने प्रत्येकी १ गडी बाद केला. सामन्यांत नाबाद ११२ धावांची खेळी केलेल्या कर्णधार ड्यु प्लेसिसला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतील दुसरा सामना ६ मार्चला सेंच्युरीयन येथे खेळविण्यात येणार आहे.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *