ड्युयान ओलिवरची दक्षिण आफ्रिकेच्या जागी कोल्पाकला पसंती

२६ वर्षीय ड्युयान ओलिवरने १० कसोटी तर २ एकदिवसीय सामन्यांत दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व केले आहे. त्यात १० कसोटी सामन्यांत त्याने तब्बल ४८ गडी बाद केले त्यात ११/९६ ही त्याची सामन्यांतील सर्वात्तम कामगिरी आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपुर्वी पाकिस्तानविरुद्धच्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेल ड्युयान ओलिवरने तब्बल २४ बळी घेत मालिकावीराचा मानकरी ठरला होता आणि कामगिरीच्या बळावर त्याने कसोटी क्रमवारीत १९ वे स्थान पटकावले आहे. दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज ड्युयान ओलिवरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकत ड्युयान ओलिवरने तीन वर्षांच्या कोल्पाक कराराचा स्विकार केला आहे. या करारानुसार ड्युयान ओलिवर यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबकडुन खेळेल. पुढील महिन्याच्या सुरुवातीला ड्युयान ओलिवर संघासोबत सरावाला सुरुवात करेल.

कोल्पाक करारात खेळाडु देशाच प्रतिनिधित्व करु शकत नाही तसेच कराराच्या कार्यकाळात खेळाडु देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळु शकतो पण त्याचे प्राधन्य काउंटी क्रिकेट असत. काउंटी संघात कोल्पाक खेळाडु घरगुती खेळाडु म्हणुन खेळतात. कोल्पाक खेळाडुने चार वर्षे काउंटी संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर खेळाडु इंग्लंड संघाकडुन खेळण्यास पात्र ठरु शकतो. या आधी आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज या देशांच्या अनेक खेळाडुंनी कोल्पाक कराराला पसंती दिली आहे. त्यामागचे मुळ कारण आहे की कोल्पाक करारात मिळणारा पैसा हा देशाचे प्रतिनिधित्व करताना मिळणाऱ्या पैशापेक्षा जास्त आहे.

दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वेचे जास्तीत जास्त खेळाडुंनी कोल्पाक करार स्विकारला आहे याचे महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे कोट्यानुसार होणारी संघ निवड. महत्त्वाची बाब म्हणजे सध्याचा दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिस २००७ ते २०१० मध्ये कोल्पाक करारानुसार लॅंकशायरचे प्रतिनिधित्व करत होत पण त्यानंतर तो २०११ पासुन दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करत आहे. मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेचे जलदगती गोलंदाज मॉर्ने मॉर्केल आणि वेन पार्नेलने सगळ्यांना धक्का देत निवृत्ती जाहीर करत कोल्पाकला पसंती दिली आहे.

कोल्पाक खेळाडु

दक्षिण आफ्रिका:- फाफ ड्यु प्लेसिस, निल मॅकेंझी, अल्विरो पीटरसन, रॅन मॅक्लॅरेन, आंद्रे नेल, कॉलिन इंग्राम, जॅक्स रुडॉल्फ, जस्टिन केंप, पॉल हॅरीस, अॅश्वेल प्रिन्स, अल्फॉन्सो थॉमस, काइल अॅबॉट, रिली रॉस्वो, डेविड विझे, स्टाईन वॅन झिल, सिमर हार्मर, हार्डस विल्जोन, मॉर्ने मॉर्केल,वॅन पार्नेल, रिचर्ड लेवी, अॅड्र्यु हॉल

झिम्बाब्वे:- मरे गोडविन, अॅन्डी फ्लॉवर, ग्रॅट फ्लॉवर, काईल जार्विस, ब्रेंडन टेलर

वेस्ट इंडिज:- ड्वेन स्मिथ, पेड्रो कॉलिन्स, ब्रेंडन नॅश, कॉरी कॉलिमोर, टिनो बेस्ट, रवि रामपॉल, फिडेल एडवर्डस, व्हेवल हाइंडस

न्युझिलंड:- आंद्रे अॅडम्स, ग्रॅंट एलिएट

नेदरलॅंड:- रॅन टेन डॉइश्चेट

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *