ईएसपीएन क्रिकइन्फो पुरस्कारावर भारतीय खेळाडुंच वर्चस्व!!

दरवर्षीप्रमाणेच यावर्षी ही ईएसपीएन क्रिकइन्फोने २०१८ च्या कामगिरीनुसार पुरस्कार जाहीर केले आहेत. १२ व्या ईएसपीएन क्रिकइन्फो पुरस्कारात जाहीर केलेल्या १२ पुरस्कारांपैकी ५ पुरस्कारांवर भारतीय खेळाडुंनीच कब्जा केला आहे. पुरस्कार निवडण्यासाठीच्या सदस्यात माजी खेळाडुपैकी इयान चॅपेल, कर्टनी वॉल्श, रमिझ राजा, डॅरील कुलिनन, अजित आगरकर, फिल सिमन्स व मार्क निकोल्स यासोबतच ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वरिष्ट संपादकांचा यात समावेश होता.

      ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अॅडलेड मधील पहिल्या सामन्यांत चेतेश्वर पुजाराने पहिल्याच दिवशी केलेल्या १२३ धावांची खेळी २०१८ मधील सर्वोत्तम कसोटी खेळी ठरली. या सोबतच पुजाराने मालिकेत सर्वाधिक ५२१ धावा काढल्या. पुजारा सोबतच मेलबर्नमध्ये झालेल्या कसोटीतील पहिल्या डावात ३३ धावांत ६ गडी बाद करणाऱ्या बुमराहची गोलंदाजी २०१८ मधील सर्वोत्म गोलंदाजी ठरली. इंग्लंडविरुद्ध ३३६ धावांचा पाठलाग करताना न्युझिलंडच्या रॉस टेलरने केलेली नाबाद १८१ धावांची खेळी एकदिवसीय सामन्यांतील सर्वोत्तम खेळी ठरली.

        इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांत २५ धावांत ६ गडी बाद करणाऱ्या कुलदिप यादवची गोलंदाजी २०१८ मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी ठरली. एकदिवसीय सामन्यांपाठोपाठ कुलदिप यादवने टी-२० मधील सर्वोत्तम गोलंदाजी ठरली तर ग्लेन मॅक्सवेलने इंग्लंडविरुद्ध नाबाद १०३ धावांची खेळी टी-२० मधील सर्वोत्तम खेळी ठरली. २०१८ मध्ये पदार्पण केलेल्या खेळाडुंपैकी इंग्लंडचा अष्टपैलु खेळाडु सॅम करन २०१८ मध्ये पदार्पण केलेला सर्वोत्तम खेळाडु ठरला. भारताविरुद्धच्या मालिकेत अष्टपैलु कामगिरी केलेल्या सॅम करनला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

      ऑस्टेलिया महिला संघाची कर्णधार मेग लॅनिंगच्या नेतृत्वात २०१८ मधील सर्व एकददिवसीय सामने जिंकले तर १५ पैकी १४ टी-२० सामन्यांतील विजयासहं टी-२० विश्वचषकावर चौथ्यांदा कब्जा केला. मेग लॅनिंगला २०१८ मधील सर्वोत्कृष्ट कर्णधार पुरस्काराने गौरविण्यात आले. टी-२० विश्वचषकात न्युझिलंडविरुद्ध हरमनप्रित कौरने केलेली १०३ धावांची खेळी महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी ठरली तर नॅतली सायवरने टी-२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ धावांत ३ गडी बाद करत २०१८ मधील सर्वोत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन केले.

ईएसपीएन क्रिकइन्फो पुरस्कार २०१८

सर्वोत्तम कसोटी खेळी – चेतेश्वर पुजारा (भारत)

सर्वोत्तम कसोटी गोलंदाजी – जसप्रित बुमराह (भारत)

सर्वोत्तम एकदिवसीय खेळी – रॉस टेलर (न्युझिलंड)

सर्वोत्तम एकदिवसीय गोलंदाजी – कुलदिप यादव (भारत)

सर्वोत्तम टी-२० खेळी – ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)

सर्वोत्तम टी-२० गोलंदाजी – कुलदिप यादव (भारत)

पदार्पणात सर्वोत्तम खेळाडु – सॅम करन (इंग्लंड)

सर्वोत्तम कर्णधार – मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया)

सर्वोत्तम खेळी (महिला) – हरमनप्रित कौर (भारत)

सर्वोत्तम खेळी (महिला) – नॅतली सायवर (इंग्लंड)

सर्वोत्तम खेळी (असोसिएट) – कॅलम मॅक्लॉइड (स्कॉटलंड)

सर्वोत्तम गोलंदाजी (असोसिएट) – सफयान शरीफ (स्कॉटलंड)

शंतनु कुलकर्णी

   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *