भारताने घेतला पुलवामा हल्ल्याचा बदला…

पुलवामा हल्यानंतर 12 दिवसांनी भारतीय हवाई सैन्याने पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात घुसून हल्ला केला. भारतीय हवाई सैन्याने यासाठी मिराज 2000 या अत्याधुनिक विमानांचा वापर करून दहशतवाद्यांची अनेक ठिकाणे, लौंचपड्स तसेच कंट्रोल रूम उध्वस्त करण्यात यश मिळाले आहे. सूत्रांच्या बातमीनुसार किमान 250 ते 300 दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.हवाईदलाच्या या कारवाईत तब्बल १००० किग्रॅ बॉम्ब टाकण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार हवाई दलाने ही कारवाई मंगळवारी पहाटे 3.30 वाजता केली.मुजफ्फराबाद, चकोटी, बालाकोटमध्ये भारतीय दलाने दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले करत जैशचे अनेक तळ उद्धवस्त केले आहेत.

यासाठी विमानांनी पठाणकोट हवाई अड्ड्यावरून व मध्य भारतातून उड्डाण केलं.भारताने केलेल्या या कारवाईला पाकिस्तान लष्करप्रमुखांनी दुजोरा दिला आहे.पाकिस्तानात घुसून केलेल्या हवाई हल्ल्यात जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहर, धाकटा भाऊ मौलाना तल्हा सैफ ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.  मसूद अजहरचा मेहुणा युसुफ अजहरचाही खात्मा झाला आहे. या हल्ल्यात अनेक हिटलिस्टवर असणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *