कंबरेच्या दुखापतीमुळे हार्दिक पंड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी- २० आणि एकदिवसीय मालिकेला मुकणार

ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंडविरुद्धचा दौरा यशस्वी ठरल्यानंतर विश्वचषक २०१९ पूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात अखेरची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात २ टी-२० आणि ५ एकदिवसीय सामने खेळविले जाणार आहेत. पण या मालिकेपुर्वीच भारतीय संघाला एक धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या कंबरेच्या दुखापतीमुळे टी- २० आणि एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे त्यामुळे भारताला विश्वचषक २०१९ पूर्वीच एक मोठा धक्का बसला. दुखापतग्रस्थ हार्दिक पांड्याच्या जागी रविंद्र जडेजाला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आला आहे तर टी-२० चा संघ कायम ठेवला आहे.

२०१९ च्या विश्वचषकापूर्वीची ही अखेरची मालिका आहे त्यामुळे भारतीय संघ सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंना संधी देईल जे विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यांत खेळतील. त्यामुळे दुखापतग्रस्थ हार्दिक पांड्याच्या जागी कोणाला संधी मिळते हे पाहावे लागेल. कारण संघात आधीच विजय शंकरच्या रूपाने एक अष्टपैलू खेळाडू आहे त्यात आता रवींद्र जडेजाला पांड्याच्या जागी संघात स्थान देण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे के एल राहुल संघात पुनरागमन करत आहे तर मयांक मार्कंडेला पहिल्यांदाच भारताच्या टी-२० संधी मिळाली आहे तर विश्रांतीनंतर जसप्रीत बुमराह आणि कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा भारतीय संघाकडून खेळताना दिसतील.

दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेला २४ फेब्रुवारी पासून विशाखापट्टणम येथे सुरुवात होणार आहे तर पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला २ मार्च पासून हैद्राबाद येथे सुरुवात होणार आहे.

भारतीय संघ पुढीलप्रमाणे

टी-२० संघ:-

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, जसप्रित बुमराह, यजुवेंद्र चहल, दिनेश कर्तिक, क्रुणाल पंड्या, रिषभ पंत, सिद्धार्थ कौल, मयंक मार्कंडेय, के एल राहुल, उमेश यादव, विजय शंकर

एकदिवसीय संघ:-

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, जसप्रित बुमराह, यजुवेंद्र चहल, कुलदिप यादव, रविंद्र जडेजा, रिषभ पंत, के एल राहुल, उमेश यादव, विजय शंकर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार (शेवटच्या तीन सामन्यांसाठी), अंबाती रायडु, सिद्धार्थ कौल (पहिल्या दोन सामन्यांत)

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *