सय्यद मुश्ताक अली टी-२० चषक

रणजी चषक, देशांतर्गत एकदिवसीय मालिका (विजय हजारे चषक) सोबतच बीसीसीआयने २००६-०७ मध्ये २७ रणजी संघात टी-२० स्पर्धा खेळविण्यात आली आणि त्यानंतर २००९-१० पासुन ही स्पर्धा भारताचे माजी खेळाडु सय्यद मुश्ताक अली यांच्या नावाने “सय्यद मुश्ताक अली टी-२० चषक” म्हणुन खेळविण्यात येत आहे. २००६-०७ मध्ये झालेल्या आंतरराज्य टि-२० स्पर्धेत तामिळनाडु संघाने पंजाब संघाचा पराभव करत चषक पटकावला होता तर २००९-१० मध्ये सय्यद मुश्ताक अली टी-२० चषकात महाराष्ट्राच्या संघाने हैद्राबादचा पराभव केला होता. आतापर्यंतच्या इतिहासात बडोदा आणि गुजरात संघाने प्रत्येकी दोनदा चषक जिंकला आहे तर महाराष्ट्र, बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्लीने एकदा तर २०१६-१७ मध्ये ही स्पर्धा विभागानुसार खेळविण्यात आली होती त्यात पुर्व विभागाने मध्य विभागाचा पराभव केला होता.

सय्यद मुश्ताक अली टी-२० चषक २०१९, २१ फेब्रुवारी ते १४ मार्च दरम्यान खेळविण्यात येणार आहे त्यातील २१ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान साखळी सामने विजयवाडा, सुरत, इंदोर, कटक, दिल्ली हैद्राबाद, भिमपोरे (सुरत) येथे खेळविण्यात येणार आहेत. २०१९ च्या सत्रात संघांची पाच गटात विभागणी करण्यात आली आहे त्यात गट अ, गट ब आणि गट क मध्ये प्रत्येकी ७ संघांचा समावेश आहे तर गट ड आणि गट इ मध्ये प्रत्येकी ८ संघांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील दोन संघ पुढच्या फेरीत दाखल होतील त्यांची दोन गटात विभागणी केली आहे. प्रत्येक गटात सर्वाधिक गुण मिळवणारा संघ अंतिम फेरी एकमेकांविरोधात १४ मार्च ला लढतील.

रणजी स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केलेल्या मुंबईला आजपर्यंत सय्यद मुश्ताक अली चषक जिंकता आलेला नाही त्यामुळे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईला यावेळेस विजेतेपदाची अपेक्षा असेल. अजिंक्य रहाणेसोबतच पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकुर, तुषार देशपांडेवर मुंबईचा मदार असेल. युवराज सिंग, रविचंद्रन अश्विन, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, मयंक अगरवाल, मनिष पांडे, हरभजन सिंग, इशांत शर्मा यांसारखे तगडे खेळाडु स्पर्धेत खेळणार असल्याने स्पर्धा रोमांचक होईल यात शंका नाही.

सय्यद मुश्ताक अली टी-२० चषक २००७-२०१८

सर्वाधिक सामने – बिपुल शर्मा (हिमाचल प्रदेश, पंजाब) ५५ सामने

संघाच्या सर्वाधिक धावा – दिल्ली २३६/९ वि. आंध्र प्रदेश

निच्चांकी धावसंख्या त्रिपुरा ३० वि. झारखंड

सर्वाधिक धावा – इशांत जग्गी (पुर्व विभाग, झारखंड) १४५९ धावा

सर्वोच्च धावा – सुरेश रैना (उत्तर प्रदेश) नाबाद १२६ धावा वि. बंगाल

एका स्पर्धेत सर्वाधिक धावा – केदार देवधर (बडोदा) ४११ धावा,
रिषभ पंत (दिल्ली) ४११ धावा

स्पर्धेतील पहिले शतक – रोहित शर्मा (मुंबई) नाबाद १०१ वि. गुजरात

सर्वाधिक शतके – उन्मुक चंद (दिल्ली) ३ शतके

सर्वाधिक अर्धशतके – मयंक अगवाल (कर्नाटक, दक्षिण विभाग) १२ अर्धशतके

सर्वात मोठी भागिदारी – मनप्रित जुनेजा व अबदुल्लाहद (गुजरात) २०२* धावा वि. केरळ

सर्वाधिक बळी – पदंमनाभम प्रशांत (केरळ) ६४ बळी

सामन्यांत सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे पृथ्थकरण – दिपक पुनिया (सर्विसेस) ६/१४ वि. हरियाणा

एका स्पर्धेत सर्वाधिक बळी – लुकमन मेरिवाल (बडोदा) २१ बळी

सामन्यांत ५ बळी – लव अबलिश (पंजाब) २ वेळेस

सामन्यांत ४ बळी – पंकज जैस्वाल (हिमाचल प्रदेश) ५ वेळेस

सर्वाधिक झेल व यष्टिचीत – दिनेश कार्तिक (दक्षिण विभाग, तामिळनाडु) ४० झेल १८ यष्टिचीत

सर्वाधिक झेल – मनोज तिवारी (बंगाल, पुर्व विभाग) ३३ झेल

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *