सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी पृथ्वी शॉचा मुंबई संघात समावेश

रणजी स्पर्धेत निराशजनक कामगिरी केल्यानंतर मुंबईचा संघ सय्यद मुश्ताक अली देशांतर्गत टी-२० स्पर्धेत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यात मुंबई संघासाठी महत्त्वाची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियात सराव सामन्यांत पायाचा घोटा दुखावल्यामुळे पृथ्वी शॉला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागले होते. पृथ्वी शॉने २०१८ मध्ये कसोटी पदार्पणात शतकी खेळी केली होती. घोट्याच्या दुखापतीतुन सावरत त्याने मुंबईच्या संघात स्थान मिळवले आहे ही मुंबई संघासाठी मह्त्त्वाची गोष्ट आहे. भारतीय संघ विश्वचषक २०१९ नंतर कसोटी सामने खेळणार आहे त्यामुळे पृथ्वी शॉला तो पर्यंत सराव पण भेटेल.

२१ फेब्रुवारी पासुन सुरु होणाऱ्या सय्यद मुश्ताक अलीला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबई संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले आहे. रहाणेसोबतच श्रेयस अय्यर, सिदंधेश लाड, सुर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ आणि आदित्य तरेवर मुंबईच्या फलंदाजीची जिम्मेदारी असेल तर गोलंदाजीची मदार असेल धवल कुलकर्णी, शार्दल ठाकुर आणि तुषार देशपांडेवर. मुंबईचा पहिला सामना सिक्कीमविरुद्ध असेल आणि त्यानंतर मुंबईचा संघ पंजाब, मध्य प्रदेश, गोवा, रेल्वे आणि सौराष्ट्राविरुद्ध खेळेल.

पृथ्वी शॉ पाठोपाठ यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने दुखापतीनंतर पुनरागमन केले आहे. २०१८ च्या आयपीएलच्या सत्रात साहाच्या खांद्याला दुखापत झाली होती त्यामुळे तो इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकला होता. साहाच्या अनुपस्थितीत रिषभ पंतला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आणि या संधीचा पुरेपुर फायदा उठवत पंतने दमदार कामगिरी केली आहे त्यामुळे साहाला संघात पुन्हा स्थान मिळवायचे असेल तर कामगिरीत सातत्य राखावे लागले.

      तामिळनाडु संघाचे नेतृत्व रविचंद्रन अश्विनकडे सोपविण्यात आले आहे तर भारतीय संघातुन बाहेर असलेले सुरेश रैना, युवराज सिंग, मनीष पांडे हे देखील आपापल्या संघाचे प्रतिनिधित्व करतील. तसेच मागिल कित्येक दिवसांपासुन भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघातुन बाहेर असलेला पण भारताच्या कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग असलेला इशांत शर्मा दिल्ली संघाचे नेतृत्व करणार आहे. ही इशांत शर्मासाठी आयपीएलची तयारीच असेल. त्यामुळे सय्यद मुश्ताक अली स्पर्धा आयपीएलच्या तयारीसाठी महत्त्वाची ठरेल हे नक्की. दर्जेदार खेळाडुंचा भरणा असल्याने स्पर्धा रोमांचक होईल यात शंका नाही.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *