युवा विश्वा फर्नांडो व कसुन रजिथा समोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २३५ धावांत संपुष्टात, फर्नांडोचे सर्वाधिक ४ गडी

एकेकडे आफ्रिकेनी पाकिस्तानचा कसोटी मालिकेत ३-० ने पराभव करत कसोटीतले आपले वर्चस्व सिद्ध केले होते तर दुसरीकडे श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-० ने पराभव स्विकारावा लागला आणि श्रीलंकेची कसोटीतील कामगिरीचा आलेख वरचे वर घसरत चालला होता. ऑस्ट्रलियाच्या मालिकेनंतर श्रीलंकेचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ओशादा फर्नांडो व लसिथ एम्बुलदेनिया श्रीलंकेसाठी पदार्पणाचा सामना खेळत होते. अनुभवी अॅजेलो मॅथ्युज आणि दिनेश चांदिमलच्या अनुपस्थितीत श्रीलंकेचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष होते.

विश्वा फर्नांडोने डावाच्या दुसऱ्याच षटकांत डीन एल्गार बाद करत आफ्रिकेला पहिला झटका दिला आणि त्यानंतर फर्नांडो आणि लकमलच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेची अवस्था ७.४ षटकांत ३ बाद १७ झाली होती. पहिल्या तासाभराच्या खेळात आफ्रिकेचा संघ अडचणीत सापडला होता त्यानंतर तेंबा बवुमा व कर्णधार फाप ड्यु प्लेसिसने डाव सावरला आणि दोघेही चांगल्या लयीत दिसत होते. पहिल्या सत्राच्या अखेरीस दोघेही नाबाद राहतील असे दिसत होते पण रजिथाने फाप ड्यु प्लेसिसला (३५) बाद करत आफ्रिकेला चौथा झटका दिला आणि आफ्रिकेची अवस्था ४ बाद ८९ झाली होती.

      फाफ माघारी परतल्यानंतर बवुमा ४७ धावांवर धावबाद झाला आणि बघता-बघता आफ्रिकेची अवस्था ६ बाद १३१ झाली होती. आफ्रिकेची भिस्त पूर्णपणे क्विंटन डी कॉक वर होती. त्यामुळे त्याला चांगल्या साथीची आवश्यकता होती. दक्षिण आफ्रिकेच्या वरच्या फळीला उधवस्त केलेल्या श्रीलंकेच्या गोलंदाजांचा डी कॉक व केशव महाराजने यशस्वीपणे सामना केला. दोघेही आफ्रिकेला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन देतात की काय असे दिसत असताना महाराज ३५ चेंडूत २९ धावा काढुन माघारी परतला. क्विंटन डी कॉकने महाराज सोबत ७ व्या गड्यासाठी ४७ धावा जोडल्या.

      केशव महाराज बाद झाल्यानंतर आफ्रिकेनी ८ धावांत आणखी एक गडी गमावला त्यातच क्विंटन डी कॉकने कसोटीतले १५ वे अर्धशतक झळकावले. त्यानंतर डी कॉकने डेल स्टेनसोबत ९ व्या गड्यासाठी ३३ धावांची भर घातली. शेवटी आफ्रिकेचा डाव २३५ धावांत संपुष्टात आला. डी कॉक (८०) बाद होणारा आफ्रिकेचा शेवटचा गडी होता. दक्षिण आफ्रिकेकडुन क्विंटन डी कॉकने सर्वाधिक ८० धावा काढल्या तर श्रीलंकेकडुन युवा विश्वा फर्नांडोने सर्वाधिक ४ तर कसुन रजिथाने ३ गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिल्या दिवशीच २३० धावांत बाद करत श्रीलंकेच्या गोलंदाजांनी आपले काम केले होते त्यामुळे आता श्रीलंकेच्या फलंदाजांवर श्रीलंकेची भिस्त होती.

      मॅथ्युज व चांदिमलच्या अनुपस्थितीत कर्णधार करुणारत्ने, कुशल परेरा, कुशल मेंडीस व निरोशन डीकवेलाला फलंदाजीची धुरा होती. श्रीलंकेला पहिल्या दिवसात जवळपास २५ षटके खेळुन काढायची होती. सलामीला आलेल्या कर्णधार करुनारत्ने आणि थिरीमाने कडुन चांगल्या सलामीचा अपेक्षा होती पण डेल स्टेनने थिरीमानेला बाद करत श्रीलंकेला पहिला झटका दिला. पण त्यानंतर करुनारत्नेनी पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या ओशाद फर्नांडो सोबत संघाचा डाव सांभाळला पण अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला तेव्हा श्रीलंकेनी १ गडी गमावत ४९ धावा केल्या. करुनारत्ने २८ तर ओशाद फर्नांडो १७ धावांवर नाबाद राहिले. आफ्रिकेकडुन डेल स्टेनने अकमेव गडी बाद केला.

शंतनु कुलकर्णी  

2 thoughts on “युवा विश्वा फर्नांडो व कसुन रजिथा समोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २३५ धावांत संपुष्टात, फर्नांडोचे सर्वाधिक ४ गडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *