अक्षय कर्नेवारच्या शतकाने विदर्भाला पहिल्या डावात ९५ धावांची मह्त्त्वपुर्ण आघाडी, दिवसअखेर शेष भारत २ बाद १०२

दुसऱ्या दिवसअखेर विदर्भाच्या संघाने ६ गडी गमावत २४५ धावा केल्या होत्या. अक्षय वाडकर ५० तर अक्षय कर्नेवर १५ धावांवर नाबाद होते. त्यानंतर तीसऱ्या दिवशी विदर्भाला आघाडी मिळवण्यासाठी या जोडीने मैदानावर टिकणे महत्त्वाचे होते. या जोडीने तीसऱ्या दिवशी १३ षटकांत ६० धावा काढत धावसंख्या ३०० च्या पार नेली होती. पण अक्षय वाडकर ७३ धावा काढुन राहुल चहरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. हा विदर्भसाठी मोठा धक्का होता.

वाडकर बाद झाल्यानंतर मैदानावर असलेल्या कर्नेवारवर मोठी जिम्मेदारी होती. आता तो खालच्या क्रमांकावरील फलंदाजांसोबत कशी फलंदाजी करतो याकडे सर्वांचे लक्ष्य होते. ८ व्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला कर्नेवार चांगल्या लयीत दिसत होता. वाडकर बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या अक्षय वखारेला प्रत्येक चेंडूवर धावा अपयश आले पण त्याने कर्नेवारसोबत २४.३ षटकांत ७६ धावंची आघाडी घेत विदर्भाला आघाडी मिळुन दिली होती. अक्षय कर्नेवारने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक झळकावत संघाला आघाडी मिळवुन देणात महत्त्वाची भुमिका निभावली. पण शतक साजरे केल्यानंतर लगेचच कर्नेवार १०२ धावा काढुन राहुल चहरच्या गोलंदाजीवर पायचित झाला. कर्नेवार बाद झाला तेव्हा विदर्भने ८ गमावत ३८१ धावा केल्या होत्या.

शेवटच्या दोन गड्यासाठी विदर्भाचे फलंदाज किती धावांचे योगदान देतात याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यात रजनिश गुर्बानीने नाबाद २८ धावांचे तर यश ठाकुरने १० धावांचे योगदान दिले आणि विदर्भाचा पहिला डाव ४२५ धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावात ९५ धावांची आघाडी घेत सामन्यांवर आपले वर्चस्व निर्माण केले होते. विदर्भाकडुन अक्षय कर्नेवारने सर्वाधिक १०२ धावांची खेळी केली तर शेष भारत संघाकडुन राहुल चहरने सर्वाधिक ४ तर कृष्णप्पा गौतम, अंकित राजपुत आणि धरमेंद्रसिंग जडेजाने प्रत्येकी २ गडी बाद केले.

      पहिल्या डावात ९५ धावांनी पिछाडीवर पडलेल्या शेष भारत संघाला मयंक अगरवाल आणि अनमोलप्रित सिंग या सलामीवीरांकडुन चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती पण पहिल्या डावाप्रमाणेच या डावातही अनमोलप्रित सिंग अपयशी ठरला आणि २५ धावांवर शेष भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर अगरवाल आणि हनुमा विहारीने दुसऱ्या गड्यासाठी १९ धावांची भर घातली. पण पहिल्याडावात ९५ धावांची खेळी केलेला अगरवाल (२७) अक्षय वखारेच्या गोलंदाजीवर मोहीत काळे कडे झेल देऊन परतला. ४६ धावांत दोन गडी गमावल्यामुळे शेष भारत संघाची जिम्मेदारी हनुमा विहारी आणि कर्णधार अजिंक्य रहाणेवर आली होती. अजिंक्य रहाणे फिरकी गोलंदाजांसमोर बिचकतच खेळत होता आणि दिवसअखेर शेष भारताने २ गडी गमावत १०२ धावा केल्या तेव्हा विहारी ४० तर रहाणे २५ धावांवर नाबाद होते. विदर्भाकडुन अक्षय वखारे आणि आदित्य सरवटेनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तीसऱ्या दिवसअखेर शेष भारताकडे फक्त ७ धावांची आघाडी आहे त्यामुळे जर रणजी विजेत्या विदर्भासमोर शेष भारताला मोठे आव्हान द्यायचे असेल तर विहारी आणि रहाणेला चौथ्या दिवसाचे पहिले सत्र खेळुन काढावे लागेल आणि त्यानंतर श्रेयस अय्यर, इशान किशन आणि कृष्णप्पा गौतम झटपट धावा करु शकतात. 

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *